
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या शासकीय योजनेंतर्गत असलेल्या निधीच्या जमा प्रक्रियेत झालेला विलंब तात्काळ दूर करण्यात येणार आहे. संबंधित विभागाशी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा केल्यानंतर, यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अँड. प्रफुल्ल चौहान यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
यामुळे सर्व लाभार्थी बहिणींच्या खात्यात पैसे ताबडतोब जमा होतील.
अँड. चौहान यांनी सांगितले की, “सरकारकडून येणाऱ्या सर्व योजना पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लाडक्या बहिणींच्या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही.”
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना आता त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार असल्यामुळे हजारो बहिणींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटणार आहे.
