विहिरगाव येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट, आमदार प्रा अशोक ऊईके व तहसीलदार अमित भोईटे यांनी दिली भेट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथील युवा शेतकरी वैभव देवराव लुंगसे (19) यांने ४सप्टेंबर रोजी स्वताच्या शेतात जाऊन विषारी किटक नाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली होती तर त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट आज दि 9 सप्टेंबर रोजी आमदार प्रा अशोक ऊईके व तहसीलदार अमित भोईटे यांनी भेट घेतली व कुटुंबातील सदस्या सोबत आत्महत्या बदल सविस्तर चर्चा केली व कुटुंबाचे सांत्वन केले आणि प्रशासनाला प्राथमिक अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यास सांगितले दिली तसेच कुटुंबाला शासनाकडून सर्व स्तरी मदत मिळून देण्याची ग्वाही दिली त्यावेळी त्यांच्या सोबत भाजप तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे , वडकी सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे , तलाठी सौरभ चांदेकर , कोतवाल रवी ठाकरे , पांडुरंग भेदुरकर, गिरीश कारमुरे , तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.