गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाया मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढावा,गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांचे प्रतिपादन

गोंडपिपरी :- तालुक्यातील गोंडवाना गणतंत्र पार्टीची तालुका कार्यकरणी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.

गोंडवाना गणतंत्र पार्टी ही बहुजन, गोरगरीब, बंजारा अगडपगड जातीत विखूरलेल्या मूलभूत हक्कपासून वंचित असलेल्या समाजघटकाची पार्टी आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशातील चौथा पर्याय म्हणून हा पक्ष अस्तित्वात आला आहे. गेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आदिवासी सह वंचित व समाजघटकाला काँग्रेस व भाजप सारख्या पुंजवादी व भांडवलशाही यांनी न्याय दिला नाही व भविष्यात देणारही नाही. तेव्हा पर्याय नव्हता हा समाज मुठभरांचा गुलाम होऊन जगत होता. गुलामीत जीवन जगणे ही काही खरी माणुसकी नव्हे त्यामुळे यातून योग्य मार्ग काढून देशातील चौथा पर्याय म्हणून गोंडवाना रत्न दादा हिरासिंह मरकाम यांनी तमाम या वंचित, शेतकरी, बेरोजगार व आदिवासीना न्याय मिळवून देण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीची स्थापना केली. हा पक्ष सर्व वंचित घटकांचा हक्काचा पक्ष आहे. हा पक्ष जातीवाचक नसून प्रदेशवाचक व सलग प्राचीन काळात गोंडवाना भूप्रदेशात राहणाऱ्या बहुजन समाजबांधवांचा आहे. संज्ञा राष्ट्रवाचक व प्रदेशवाचक आहे. त्यामुळे कुणीही गोंड जातीचा पक्ष समजू नये. या पक्षात सर्व वंचित घटकांना सामावून घ्यावे. आणि पक्ष वाढीसाठी जनसंपर्क वाढवून एक हाती मोहीम राबवावी असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांनी केले.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, भीमराव मेश्राम माजी सभापती पं. स. जिवती, भीमराव पाटील जुमनाके, हनुमंत कुमरे माजी सरपंच, कोवे महाराज, श्री. चोथले सर, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे निरीक्षक व विचावंत प्रा. डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते.

गोंडवाना गणतंत्र पार्टी गोंडपिपरी तालुका कार्यकरणी गठीत करण्यात आली त्यात सरपंच प्रदीप मडावी तालुकाध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी विलास आत्राम, सत्यदेव वेलादी व देवराव शेडमाके, तालुका सचिव भैय्याजी सिडाम व योगेश कोरवते. किसान सेल तालुका अध्यक्षपदी विलास वेलादी, उपाध्यक्ष पदी अरुण सिडाम व देवराव शेडमाके, कोषाध्यक्ष व संघटक सचिव दीपक पेंदोर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राकेश अलाम, सचिव विनोद कोवे, सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख नंदू कन्नाके, सल्लगार व तालुका निरीक्षक म्हणून पिसाजी कुळमेथे, नामदेव मडावी व दादाजी मडावी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप कुळमेथे, दीपक पेंदोर,भैय्याजी सिडाम, नंदू कन्नाके यांच्यासह गोंडवाना गणतंत्र पार्टी गोंडपिपरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.