
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम स्वच्छता चा मुलं मंत्र देणारी वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त एक वैचारिक शिबिर आयोजित केले होते त्या निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित “‘ सत्यशोधक विचार बोध परीक्षा “‘ घेण्याचं आयोजन केले होते या निमित्ताने अध्यक्ष म्हणून डॉ अंजली गवार्ले यांना आमंत्रित केले होते परीक्षा केंद्र प्रमुख मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि विशेष अतिथी कुंदा तोडकर उपस्थित होत्या* सत्यशोधक विचार बोध परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी परीक्षा केंद्र निर्माण केले होते आणि संत गाडगेबाबा यांच्या जिवन कार्याचा लेखाजोखा जयंती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि समाजातील विविध घटकांना माहित व्हावा यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता यांच्या नियोजन समितीचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन कोवे गुरुजी संयोजक रवी कुमार भोंगाडे सहसंयोजक प्रकाश डब्बावार होते डॉ अंजली गवार्ले यांनी दिप नगर परीक्षा केंद्रावर प्रामुख्याने भेट दिली संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पुजन करुन जयंतीनिमित्त सर्व परीक्षार्थी ना विशेष शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे मन भरुन कौतुक केले आणि चहा पाणी घेण्यासाठी सर्वांना घरी आमंत्रित केले संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रास्ताविक विचार मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुमार भोंगाडे संयोजक यांनी केले या उपक्रमात सहभागी मा श्रावण पाडसेनेकुन गुरुजी, मंगला सोयाम,संध्या काळे, शितल, जाधव,प्रकाश डब्बावार,दत्ता वेलादे विद्या गाडेकर, अनेक केंद्र प्रमुख सहभागी होते
