
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वर्गीय गणपतराव पेंदोर (माजी मुख्याध्यापक) यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन पेंदोर परिवाराच्या वतीने अत्यंत श्रद्धेने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त गरजू नागरिकांना मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री जयसिंगकार सर, श्री सेगेकर सर, श्री रामगडे सर, श्री वारेकर सर व डॉ. डाके सर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पेंदोर परिवाराच्या वतीने आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. स्व. पेंदोर गुरुजी यांच्या जीवनकार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची आठवण करून दिली.
कार्यक्रमात विदर्भातील नामवंत कलाकार गणेशभाऊ भोयर (गझल सम्राट) तसेच शंकरभाऊ कोवे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तिगीत व भजन संध्येने वातावरण भक्तिमय झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गोपालजी आडे होते, तर उद्घाटक म्हणून श्री हेमंत गांधी (माजी तालुका आरोग्य अधिकारी) लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रताप आडे (विक्रीकर आयुक्त, मुंबई), श्री विनयभाऊ मनोत, श्री प्रमोद बहाड सर (यवतमाळ), अॅड. अल्पेश देशमुख (नागपूर), श्री बबनभाऊ भोंगारे (माजी नगराध्यक्ष), श्री मधुकरराव गेडाम (माजी तहसीलदार) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पेंदोर परिवारातील श्री संदीप पेंदोर, सौ. शुभांगी पेंदोर, श्री अतिश पेंदोर, सौ. अश्विनी पेंदोर, शिव, आयुष्य, यशस्वी व त्यक्ष पेंदोर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रुपेश रेंगे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांचा, शिक्षकवर्गाचा व पेंदोर परिवारावर प्रेम करणाऱ्या समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.
