
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.
या निवडीत अध्यक्षपदी श्री. किशोर वाल्मीकराव धोटे यांची तर उपाध्यक्षपदी सौ. साधना रंजीत चांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी पुढील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे —
सौ. नेहा दिनेश बेहेरे,
सौ. आरती मंगेश तडस,
सौ. रुपाली गणेश धांमदे,
श्री. भारत विठ्ठल मडावी,
श्री. मनोज गोसावी कोडापे,
श्री. गणेश किसणा आत्राम,
श्री. अतुल राजेश्वर लाभाडे.
या निवड प्रक्रियेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सदस्यांनी निलेश भाऊ गुजरकर, विनोद भाऊ बेहेरे, नरेंद्र भाऊ आत्राम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. गुप्ता सर आणि सौ. सुनीता वासुदेव आत्राम (सुनीता मनोज शेडमाके) यांचे मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा
