
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात बाजाराची दिवशी गर्दीचा फायदा उचलत मोबाईल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले . या मोबाईल चोरावर आळा बसविण्यासाठी राळेगाव शहर चे कर्तव्यदक्ष पोलीस ठाणेदार जाधव हे स्वतः ऑन रोड उतरून शुक्रवारी मोबाईल चोरी होऊ नये यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसले.
राळेगाव या शहरांमध्ये शुक्रवार रोजी आठवडी बाजार भरत असतो त्यामुळे बाजारात व मार्केटमध्ये भाजीपाला सामान घेणाऱ्याची खूपच गर्दी असते. या गर्दीचा फायदा ही चोरी करणारी मंडळी घेत असते. गर्दीचा फायदा घेत हे चोरोटे मोबाईल मंगळसूत्र कोणाचे पॉकेट चोरत असते. यावर अंकुश लावण्यासाठी राळेगाव शहराचे कर्तव्य तत्पर व कर्तव्यदक्ष ठाणेदार जाधव साहेब हे स्वतः ॲक्शन मोड मध्ये येऊन स्वतः बाजाराचे रस्त्यावर ग्रस्त देऊन लक्ष देत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे राळेगाव शहरातील सर्वसामान्य नागरिक खुश झाल्याचे दिसले. ठाणेदाराच्या या कृतीमुळे सर्व सामान्य नागरिक हा निर्धास्त झाल्यासारखा दिसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
