आठरी नाल्यावर नवीन पूल करण्याची जंगल भागातील नागरिकांची मागणी


ढाणकी प्रतिनिधी
प्रवीण जोशी


ढाणकी शहराच्या बाजूने आठरी नाला वाहत जातो शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावरील नाले त्यावरील पूल खूप जुने आहेत पावसाच्या हलक्या सरी जरी आल्या तरी पण ढाणकी नगरीत येणारे सर्व रस्ते बंद होत राहतात
मागील वर्षी ढाणकी फुलसावनगी रोडवरील पुलावर पाणी आल्याने पुलावरील पाण्याचा अंदाज आला नसल्याने एक व्यक्ती पुरात पाण्याबरोबर वाहत गेला
ढाणकी नगरीला जोडणाऱ्या जंगल भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्या वरील आठरी नाल्याला थोड्या पावसाने सुद्धा पूर येत असतो त्यामुळे दळण वळण पूर्णतः ठप होते.
पुलावरील पाणी वाढत असते वेळी जंगल भागातील नागरिकाला ढाणकी नगरीत मुक्काम करावा लागतो याचा अनुभव अनेक नागरिकाला आला त्यामुळे जंगलं भागातील नागरिक पावसाच्या हलक्या सरी जरी आल्या तरी ढाणकी किंवा तालुका उमरखेड कडे जाणे टाळतात आठरी नाल्यावर नवीन पूल करावा म्हणून ढाणकी व जंगल भागातील नागरिकांनी वेळो वेळी प्रशासनाला मागणी केली नागरिकांची वाढती मागणी पाहून आमदार नामदेवराव ससाणे यांनी नवीन पूल करीता निधी उपलब्ध झाला असून लवकरच पुलाचे काम होणार असे आश्वासन दिले होते मात्र याला एक वर्ष होत आले परंतु पुलाचे काम झाले नाही त्यामुळे मागील दोन दिवसा पासून पावसाच्या पाण्याने ढाणकी व बिटरगाव किनवट रस्ता बंद होता नागरिक पुलावरील पाणी उतरण्याची तासनतास वाट पाहत आहेत मागील वर्षी जिल्हाधिकारी आमोल येडगे साहेब यांनी पुलाची पाहणी करून बांधकाम विभागाचे अभियन्ता यांना नवीन पूल करीता प्रस्ताव पाठवण्याचे सांगून उपस्थित नागरिकाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मात्र जिल्हाधिकारी यांचे आश्वासन सुद्धा आश्वासन च राहिले असल्याचे परिसरातील नागरिक म्हणत आहेत
पुल खूप जुना असल्या कारणाने पुला शेजारील दोन्ही काठावरील शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
लवकरात लवकर पुलाचे बांधकाम करावी जेणे करून जन्गल भागातील नागरिकांचे दळण वळण अडवणूक होणार नाही