
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जि.प.उ.प्रा.शाळा ,वनोजा .केन्द्र.धानोरा ,ता.राळेगांव जि. यवतमाळ या शाळेची सहल मुख्याध्यापक उईके मॅडम,मेश्राम सर, शिंदे मॅडम यांच्या नेतृत्वात नागपूर येथे २०२२-२३ या सत्रातील `शैक्षणिक सहल’ महामंडळ बसने ६० विद्यार्थ्यांची नेण्यात आली. रमन विज्ञान केन्द्र,चिल्ड्रेन पार्क,महाराजा बाग,दिक्षाभूमी,विमानतळ नंतर शेवटी मेट्रो प्रवासाचा आनंद दोन तास विद्यार्थ्यांनी लुटला.

वनोजा शाळेची सहल बसने कधीच नेण्यात आली नाही.तेव्हा पालक वर्गातून खूप आनंदाचा सुर उमटत आहे की आमच्या मुलाला सहलीच्या निमित्ताने सवलतीच्या दरात नागपूरातील ठळक बाबी अनुभवायल्या मिळाल्या.१ ते ७वर्गाचे सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणने हे जबाबदारीचे काम आहे ते आपल्या शिक्षकांनी केले अशी पालक वर्गातून शिक्षकांना कौतुकाची थाप मिळत आहे.अशी बसने सहल नेणे कधीच वनोजा गावक-यांनी बघितली नव्हती.
श्रीगणेशा शुभारंभ करून पहाटे५.३०वाजता वनोजा शाळेतून निघाले व १० वाजताच्या दरम्यान नागपूरला पोहचले.
सर्वप्रथम रमन विज्ञान केन्द्र बघितलं .सर्व शो ५०रू.फी मध्येच होते. पहिला 3D शो नंतर दुसरा सायन्स आॉफ अ स्पिअर शो त्यानंतर तिसरा तारामंडळ हा शो बघितला .विद्यार्थ्यांनी संपूर्ण नोंदी घेतल्या.प्रतिनिधित्व श्री. मेश्राम सर यांनी केले.
त्यानंतर जेवण करून २०रू.फी ने महाराजा बाग बघितला त्यात विद्यार्थ्यांनी विविध रंगीत पक्षी व प्राणी जवळून बघितले नंतर चिल्ड्रेन पार्कला ४ वाजता पोहचले परंतू ५ वाजता सुरू होत असल्यामूळे चिल्ड्रेन पार्क पाहता आला नाही नंतर दिक्षाभूमी कडे वळले.त्यात शिस्त व शांतता विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली.प्रतिनिधित्व उईके मॅडम यांनी केले.
त्यानंतर विमानतळ पाहण्यास गेले विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले.येथे सायंकाळचे ६ वाजले होते.नंतर वेळेवर मेट्रोचा प्रवास करण्याचे ठरले.दोन्ही प्लॅटफाॅर्मचे प्रतिनिधित्व शिंदे मॅडम यांनी केले.२० रू.मध्ये १० स्टेशन जाणे व उतरून दुसरी मेट्रो पकडणे व त्याच ठिकाणी परत येणे असा तब्बल दोन तासाचा मेट्रो प्रवास चिमुकल्यांनी आनंदाने कच्चाड गर्दीत तितक्याच धाडसाने अनुभवला.
रात्रीचे ८ वाजले. विद्यार्थ्यांजवळ दोन वेळेचे डबे होते.पुरी ,भजे व कडी जेवण करून रात्री ११ वाजता वनोजा शाळेत पोहचले.यावेळी सर्व पालक वर्ग हजर होते.
अशाप्रकारे सहलीतून विद्यार्थ्यांचे धाडस वाढणे,मनातील भित्रेपणा निघणे,निरीक्षण क्षमता वाढणे,अध्ययनाला प्रेरणा मिळणे,उत्साह वाढणे,घरी खूप गोष्टी सांगणे,मित्रांत चर्चा करणे , अंताक्षरी द्वारे गाणे म्हणण्याचे कौशल्य , सांघिक भावना हे सर्व उद्दिष्टे निश्चितच विद्यार्थ्यांच्या अंगी उतरतात.350 रूपयात खूपकाही आनंदाचे क्षण आपल्या मुलाला अनुभवायला मिळतात याचा वेगळाच आनंद पालकांना मिळाला.अशाप्रकारे मा. सूर्यवंशी साहेब ,शिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प.यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच शेख लुकमान साहेब ,पं.स.राळेगांव यांच्या परवानगी ने,त्याचप्रमाणे सरपंच मा. पोटुरकर ताई ,पोलीस पाटील मा. वटाणे भाऊ यांच्या सहमताने,मुख्याध्यापक उईके मॅडम यांच्या नेतृत्वात व मेश्राम सर आणि शिंदे मॅडम यांच्या प्रतिनिधित्वात,शा.व्य.स.वअध्यक्ष मा.श्री.मोरेश्वरजी वटाणे यांच्या मंजूरीने,पालकाच्या संमतीने आणि विद्यार्थी प्रतिनिधीअर्पित प्रभाकरराव दांडेकर, आदित्य सतिशराव वाळके,कु.उन्नती हरिदासजी बुरघाटे,कु.खूषी छत्रपालजि सावध यांच्या स्ट्राॅंग मनाने शैक्षणिक सहलीची जबाबदारी पार पाडण्यात आली.
अशाप्रकारे नियोजनपूर्वक “शैक्षणिक सहल”जिल्हा परिषद उ.प्रा. शाळा, वनोजा शाळेचा उपक्रम सर्व शिक्षकांच्या नेतृत्वात राबविण्यात आला.
