शाळेच्या परिसरात पाण्याने भरले तळे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शाळेच्या परिसराला तलाव्याचे स्वरूप आले आहे दरवर्षी पावसाळ्यात या शाळेत पाणी साचले असते त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी व मैदानात खेळावे कसे असा प्रश्न पडला आहे पाणी कमी झाल्यावर सर्व परिसर चिखलमय होतो यामुळे विद्यार्थ्यांना खुप मानसिक त्रास सहन करावा लागतो पण याकडे ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक दुर्लक्ष करत आहे त्यांना जाग केव्हा येईल असा प्रश्न पडला आहे तेव्हा प्रशासनाने या विषयाकडे लक्ष द्यावे अशी दहेगाव येथील पालकांची मागणी आहे.