तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत रावेरी शाळेचे सुयश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दि. 4,5 व 6 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राळेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय खेळ व कला क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने केंद्र धानोरा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वनोजा येथे तालुकास्तरीय खेळ,कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या तालुका स्तरीय खेळ क्रीडा स्पर्धेत राळेगाव केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रावेरी या शाळेने प्रक्रम क गटात खोखो मुले विजेते, 100 मीटर आणि 200 मीटर धावने स्पर्धेत मुले विजेते तर प्रक्रम ब गटात 4 × 100 रिले रनिंग मुले विजेते, 4 × 100 रिले रनिंग मुली उपविजेते तर खो खो मुले विजेते,खो खो मुली विजेते. या तालुकास्तरीय स्पर्धेत जि.प. शाळा, रावेरी च्या भरीव कामगिरीने सर्वाधिक गुणांकन हे राळेगाव केंद्राला प्राप्त होत जनरल चॅम्पियनशिप ही राळेगाव केंद्राला मिळाली. मुख्याध्यापक राजेंद्र एकुणकर सर, प्रताप ओंकार सर,अनघा आमदे मॅडम, जयश्री पोटे मॅडम, सुवर्णा आत्राम मॅडम, हरीश मांडवकर सर मुख्य प्रशिक्षक, हेमंत सिडाम सर, शाळा व्यवस्थापन समिती रावेरी तथा पालक वर्गाकडून स्पर्धेतील रावेरी शाळेतील सर्व विजेते खेळाडूंचे अभिनंदन करत जिल्हास्तरा करीता शुभेच्छा देण्यात आल्या.