
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री टी झेड माथनकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक आर एस वाघमारे यांनी केले तर मुख्याध्यापक तथा शिक्षक व्ही एन लोडे पि पि आसुटकर व विद्यार्थीनी नम्रता शेंडे जान्हवी तोडासे रसिका राऊत यांची भाषणे झाली. संचालन सुवर्णा राऊत हिने तर आभारप्रदर्शन संस्कृती गाऊत्रे हीने केले. बी बी कामडी व्हीं टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
