मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकी साठी मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन चे राज्य सचिव साहेबराव राठोड हे उपस्थित होते. तालुक्यातील मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची कार्यकारणी मागील चार वर्षा पासून कार्यरत असून त्याअतर्गत तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सोडवण्यात आलेल्या घटनाचा आढावा यावेळी घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद चिरडे यांनी केले .त्याच प्रमाणे तालुक्यातील नवनियुक्त सदस्यां अर्चना धर्मे यांना डी. लिट. पदवी मिळाल्या बद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आल. यावेळी तालुक्यातील काही गावात विशेष शिबीर आयोजित करून नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यां समस्या सोडवणार असल्याचे ठरवण्यात आले. या वार्षिक बैठकीला मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन चे राज्य सचिव साहेबराव राठोड, कार्तिक पन्नासे अमरावती अध्यक्ष,संतोष जाधव, शेख शाहरुख शेख रज्जाक, डॉ. बी एम कोकरे तालुका अध्यक्ष, सूचित बेहरे तालुका उपाध्यक्ष, विनोद चिरडे तालुका सचिव, सदस्य म्हणून भावना खणगन, अर्चना धर्मे,माधुरी खडसे, हनुमान राडे, मनोज आत्राम, अविनाश राडे, गजानन खंडाळकर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले.