
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय पक्षाने वाभाडे एकमेकांच्या विरोधात काढण्याचे काम सुरू झाले आहे यातून राजकारण तापविण्याचा प्रकार पुढे आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे या राजकीय पुढाऱ्यांच्या आरोपामुळे मतदार मात्र द्विधा मनस्थितीत येण्याच्या मार्गावर आहे असे असले तरी निवडणुकीच्या पूर्वी मतदारांची मानसिकता जी व्हायची ती होणारच अशी प्रतिक्रिया आता राजकीय पक्षांमध्ये नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांची नुकतीच सभा आटोपली या सभेत त्यांनी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मंत्री वसंतराव पुरके यांचे नाव न घेता त्यांच्यावर उपरोधिक टोलेबाजी केली त्यात ते म्हणाले ज्यांना आपल्या माय बापाची सेवा करता येत नाही ते मतदारसंघातील जनतेची काय सेवा करणार ज्यांना मायबाप कळतात त्यांना देव कळतात यांना मायबाप समजले नाही त्यांना देव आणि जनता समजणार नाही अशी टीका आमदार अशोक उईके यांनी केली.त्यानंतर माजी मंत्री आमदार वसंत पुरके यांनीही त्याच ताकतीने त्यांना प्रतिउत्तर दिले व ते म्हणाले की असले मूर्ख राजकारणात आली की विकासाचा कसा वाटोळा होते हे दिसून येते शासनाचा पैसा खर्च होतो म्हणून त्यावर निधीच दिल्या गेला नाही त्यातून आठ ते नऊ गावाच्या शेतीचा सिंचनाचा अनुशेष भरून विकास झाला असता याच पट्ट्याने आदिवासीची २५ एकर जमीन देवदरी येथील दाबून टाकली मी भांडण करून ती जागा परत मिळवली आणि त्या कोलाम आदिवासीला परतही केली माझ्या काळामध्ये मी ११३ चौरस मीटरची कामे पूर्ण केली. बेंबळा प्रकल्पातून हे कॅनल करायचे असल्याने मी आणि अजित पवार एकत्र बसून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला हे यांना समजते का या शब्दात वसंत पुरके यांनी नाव न घेता आमदार अशोक उईके यांना मूर्खात काढत चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आरोप आणि प्रत्यारोप एकमेकांवर केल्या जातात उकाळे पाकाळे काढणे हे तर राजकीय नेत्यांचं अस्त्र आणि शस्त्र आहे मात्र यातून एखाद्या पक्षाविषयी किंवा नेत्यांविषयी मतदार आपले मत शंभर टक्के तयार करू शकत नाही त्यामुळे हा केवळ एक करमणुकीचाच विषय ठरतो.
ज्यांना मायबाप कळतात त्यांनाच देव कळतात:- डॉ अशोक उईके
ज्यांना आपल्या माय बापाची सेवा करता येत नाही ते मतदार संघातील जनतेची काय सेवा करणार ज्यांना मायबाप कळतात त्यांना देव कळतात यांना मायबाप समजले नाही तर देव आणि जनता समजणार नाही अशी टीका आमदार अशोक उईके यांनी वसंतराव पुरके यांचे नाव न घेता केली
विकास मला कळतो प्राध्यापक :- वसंतराव पुरके प्रा. पुरके म्हणाले की मी गेल्या ३२ वर्षापासून राजकारणात आहे राजकारण आणि विकास मला चांगल्याने कळतो वैयक्तिक टीका करू नये राळेगाव जवळ असणारे खर्डा धरण आम्ही सत्तेत असताना ८०% टक्के पूर्ण केले होते केवळ २०% टक्के काम शिल्लक होते ते धरण सध्या यांच्या कारकिर्दीत बंद पडले असे प्रा. वसंत पुरके यांनी म्हटले.
