महावितरण कार्यालयाची अज्ञाता कडून तोडफोड उपकार्यकारी अभियंत्याची पोलीस स्टेशनला तक्रार


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


महावितरण कार्यालय ढाणकी येथील विद्युत विभागाविषयी नागरिकात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्या जात होता . महावितरण कार्यालयाचा कारभार पूर्णता ढासळला लाईन कधी येईल जाईल याचा काही नियम नव्हता रात्री अपरात्री मनमानी पणे विद्युत विभागाचे काम चालू होते . ढाणकी आणी परिसरातील गावांनी अनेक वेळा लाईट विषयी निवेदन दिले होते मात्र महावितरण कडून कोणतीच सुधारणा लाईट येण्याजाण्या मध्ये करण्यात आली नाही अशीच लाईट विषयी ची तक्रार घेऊन पिरंजी गावातील काही विद्युत ग्राहक आले होते . मात्र पिरंजी विद्युत ग्राहक आणी वितरण अधिकारी यांच्यात पिरंजी गावातील विद्युत वरून शाब्दिक चकमक चालू होती विद्युत ग्राहक यांची तक्रार वरून कोणतीही समस्या निकाली निघाली नसल्याने अखेर विद्युत ग्राहकांनी महावितरण कार्यालयाचे तोडफोड केल्याची लेखी तक्रार महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियता विनोद चव्हाण यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनला दिली.
उपकार्यकारी आभियंता यांच्या तक्रारीत त्यांनी महावितरण कार्यालय ढाणकी येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी पिरंजी येथील काही विद्युत ग्राहक आले होते . त्यांनी कार्यालयात घुसून कार्यालयातील फर्निचर मुख्य दरवाजाचे काचा इत्यादी ची तोडफोड करून महावितरण च्या मालमतेचे नुकसान केले . त्यामुळे तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमा विरुद्ध कार्यवाही ची तक्रार दिली त्यावरून अज्ञात इसमा विरुद्ध ठाणेदार सुजाता बन्सोडे यांच्या आदेशाने तपास बिट जमादार मोहन चाटे करत आहे .


महावितरण कार्यालय ढाणकी येथील विद्युत विभागाला कोणी वाली नसल्या सारखे रात्री अपरात्री लाईट बंद करण्यात येत आहे त्यामुळे ढाणकी व परिसरातील विद्युत ग्राहक विद्युत विभागाला कंटाळले पिरंजी येथील विद्युत ग्राहक सुद्धा वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून गेले त्यांची समस्या त्वरित निकाली काढली असती तर त्यांना वितरण कार्यालयात आले नसते . मात्र महावितरण आपलं अपयश झाकून दुसऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत आहे पिरंजी येथील नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास मनसे पिरंजी गावकऱ्या सोबत उभी राहील


सादिक शेख
म.न.से.