
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर
भिसी ग्रामपंचायत येथील जनसामान्य नागरिकांच्या समस्या वर लक्ष वेधण्यासाठी जनतेकडून धडक मोर्चाच्या आयोजनातून जनतेचा आक्रोश प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचावा याकरिता चिमूर विधानसभेचे नेते मा श्री धनराजभाऊ मुंगले आणि मा श्री अरविंदभाऊ रेवतकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
या मोर्चामध्ये भिसीवासीय जनतेची नियमित पाणीपुरवठाची मागणी आणि इतर अकरा मागण्या घेऊन श्री गजानन महाराज मंदिर येथे पूजा करून प्रस्थान मुख्य मार्गाने नारेबाजी करत ग्रामपंचायत भिसि येथे सभा घेण्यात आली यावेळी मान्यवरांनी मोर्चेकरयांना मार्गदर्शन केले
यावेळी धनराजभाऊ यांनी मोर्चाला संबोधित करताना भिसी नगरपंचायतीच्या बाबतीत खोडा टाकणारे झारीतील शुक्राचार्य चिमूर तालुक्यातील आहेत तर ते कोण आहेत याचा खुलासा करावा कारण भिसी नगरमधून एकही हरकत घेण्यात आली नाही जर कुणी असेल तर त्यांनी जाहीर नाव करावे असे आव्हान चिमुर विधानसभा क्षेत्राचे नेते मा श्री धनराज मुंगले यांनी केले आहे
या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्या करिता भिसी ग्रामपंचायतचे प्रशासक श्री किशोर पिसे साहेब आणि ठाकरे साहेब सचिव हजर होते
या मोर्च्याला उपस्थित मान्यवर सर्वश्री श्रीनिवासजी शेरकी साहेब, विजयभाऊ मेहर, अक्षयभाऊ सहारे, राकेश नगराळे, ईश्वर डुकरे, जगतभाऊ, विजय ननावरे, मनोज गेडाम, प्रकाश रोकडे, नाना नंदनवार, किसन कुमले, शम्मी शेख, गोकुळ दिघोरे, खंडूजी ठोंबरे, हरिदास मोहीनकर तसेच गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
