
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
यवतमाळ विभागातील माहे नोव्हेंबर 22 व डिसेंबर 22 असे सलग दोन्ही महिन्यात विभागात यवतमाळ विभागातील एकमेव राळेगाव आगार नफ्यात आलेले आहे.यवतमाळ विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांचे हस्ते गोविंद उजवणे आगार व्यवस्थापक राळेगाव यांचा सत्कार करण्यात येवून आगारातील सर्व कर्मचारी बांधवांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी विभागाचे यंत्र अभियंता उल्लास वैद्य , विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले,उपयंत्र अभियंता प्रताप राठोड या सर्वांनी राळेगाव आगारातील समस्त अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे .
