युवासेनेचे निवेदन देताच पालिकेला जाग ,कामाला सुरूवात

वणी: नितेश ताजणे


अखेर, टिळक चौक ते दिपक चौपाटी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु, युवा सेनेच्या मागणीला यश,

नगर पालिका प्रशासनाला दिले होते निवेदन शहरातील मुख्य व सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणजे टिळक चौक ते दीपक चौपाटी (हैदराबाद रोड) या नावाने देखील ओळखला जातो. या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून चाळणी झालेली आहे. परिणामी जागोजागी खड्डे पडले असून रस्ता खड्ड्यात की खड्डे अशी अवस्था झाली आहे. आता पावसाळा सुरू झाला असून पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसून येत नाही परिणामी या मार्गावर अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांत सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी मुख्याधिकारी अभिजित वायकोस व प्रशासक तथा तहसीलदार निखिल धुळधर यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांत रस्त्याचे कामाला सुरूवात करण्यात आली नाही तर युवा सेना आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू करेल असा इशाराही युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून दिला होता. या निवेदनाची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने तात्काळ आदेश देऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी ७ जुलै ला निवेदन देण्यात आले होते आणि दुसरा दिवस म्हणजे शनिवार व रविवारी सुट्टी असतांनाही रस्त्याचे काम सुरू झाले आहे. म्हणजेच प्रशासनाने मणावर घेतलं तर तात्काळ कामे होऊ शकतात हे यावेळी दाखवून दिले आहेत.
शहरातील टिळक चौक ते दिपक चौपाटी (हैदराबाद) रोड हा अतिशय खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत परिणामी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा मागण्या केल्या स्वतः स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी या रस्त्यासाठी जानेवारी 2023 ला निधी उपलब्ध करून दिला आणि कामाचे टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे परंतु काम अजूनही सुरू झालेले नाही.
आता पावसाळा सुरू झाला असून या मार्गावर एखादा मोठा अपघात घडुन एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यावरच रस्ता बांधणीचा मुहूर्त निघणार काय? असा प्रश्न युवा सेनेने निवेदनातून उपस्थित केला असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी मुख्याधिकारी अभिजित वायकोस व प्रशासक तथा तहसीलदार निखिल धुळधर यांचेकडे करण्यात आली .
आठ दिवसांत निवेदनाची दखल न घेतल्यास युवासेना हा मार्ग बंद करून युवासेना स्टाईलने रस्ता रोको आंदोलन करणार आहे. असा इशारा निवेदनातून दिला होता. या निवेदनाची तात्काळ दखल घेत तहसीलदार तथा नगर पालिका प्रशासक अधिकारी निखिल धुळधर यांनी आदेश दिले आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. युवा सेनेच्या मागणीला यश आल्याचे अभिनंदन केले जात आहे