खासगी इंग्लिश शाळा ठरत आहे आर्थिक लुटीचे केंद्र , अनेक ठिकाणी इतर संस्थेत काम करणारे शिक्षकच बनले भागीदार

प्रशांत बदकी (संपादक लोकहित महाराष्ट्र, वरोरा चंद्रपूर)

आपला पाल्य भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवत आयुष्य सुखात घालवावे यासाठी कितीही पैसे लावायला पालक आपल्या तयार असतात. तसेच परवडत नसले तरी कुटुंबाची ओढाताण करून मूल हे इंग्लिश मीडियम मध्येच शिकले पाहिजे अशी एक पक्की खूणगाठ मध्यमवर्गीयांकडून ते सगळ्याच पालकाची झालेली आहे. तसे बघता सध्याचे युग हे वेगवान व माहिती तंत्रज्ञानाचे 4जी युग असून इंग्रजी भाषा ही सार्वत्रिक भाषा असल्यामुळे पालक इंग्लिश मीडियम मध्येच पाल्यांना टाकतात याचाच फायदा अनेक इंग्रजी शाळा व त्यांचे लुटारू संस्थाचालक घेत आहे इंग्रजी शिवाय पर्याय नाही तसे बघता हे थोड्याफार प्रमाणात वास्तव पण आहे. म्हणून मुलाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावं हा पालकांचा हट्ट राहिला त्यामुळे इंग्रजी व सीबीएससी पॅटर्न शाळा लुटीचे 6साम्राज्य बनत आहे.

बरोबर पालकाची मानसिकता जाणून घेऊन इंग्रजी माध्यमातून असलेल्या शाळा पालकाचे आर्थिक शोषण करून प्रचंड आर्थिक संपत्ती कमविने हे एक ध्येय असून कोणत्याही प्रकारची सेवा नाही व हे एक प्रकारचा धंदाच बनला अनेक इंग्लिश माध्यमांच्या संस्थाचालकांनी एक प्रकारची लूट सुरू केली आहे. शिक्षणाचा कुंभमेळा करणारे हे शिक्षण सम्राट नसून हे शिक्षण माफिया आहेत अर्थात काही संस्था अपवाद असू शकतात पण अपवाद हे उपमेय लावल्यास नियम सिद्ध होतो. पण अनेक संस्थाचालक हे लुटारू संस्थाचालक आहेत कोणत्याही प्रकारचे ध्येय प्रेरित शिक्षण यांच्याकडे नसते व वाजवी शुल्काची तर वानवाच असते. तसं बघता शिक्षण हे एक क्रिया आहे सेवेच्या स्तरावर घडली पाहिजे किमान प्राथमिक शिक्षण सर्व लहान मुलांना सक्तीचे मोफत व दर्जेदार मिळायला हवे फार तर शिक्षण संकुल हे ना नफा ना तोटा या पद्धतीने चालविणारेच शिक्षण महर्षी, बाकी सगळे कमाईला आणि लुटायलाच बसले आहेत शिक्षण आणि ज्ञान हे नफा मिळवण्याचं क्षेत्र नाही हे पण सर्व कायदे झुगारून मंत्री व सगळ्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना प्रचंड रकमेची आमिष दाखवून इंग्रजी संस्थाचालकांनी शिक्षण क्षेत्रात प्रचंड धुमाकूळ व हैदोस घातलेला आहे. विशेष करून शहरातील हे लोण खेड्यापर्यंत नव्हते पण आता इंग्लिश व सीबीएससी शाळेच्या स्वरूपातील काळाकुट्ट पहाड अनेक ग्रामीण भागाच्या आजूबाजूला आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहे. तसेच काही संस्थाचालक भाईजी व डॉक्टर मस्तवाल बनले आहे

तसेच एका इंग्लिश शाळेतील प्रकार ऐकिवात आहे की पालकांनी फी भरली नाही म्हणून लहान मुलांना बाहेर काढले व त्यांना सांगण्यात आले की तुमच्या वडिलांनी फी भरली नाही म्हणून तुम्हाला अशी शिक्षा देत आहोत म्हणजे लहान मुलांच्या मनावर आपल्या पाल्याप्रती दुजाभावाची ही एक प्रकारे पेरणीच म्हणावी लागेल तसेच फी भरली नाही त्याचा ताळेबंद लेखाजोखा लहान मुलांच्या दप्तरात दिल्या जातो. व ते मुल आपल्या पालकाला सर्व त्याच्या संदर्भातील घडलेली घटना सांगतो की मला फी भरली नाही म्हणून सरांनी बाहेर काढले अशा पद्धतीने मुलांना अपराधीपणाची भूमिका वाटने साहाजिक आहे सीबीएससीच्या संस्था या स्वयंअर्थसाहीत असल्याने त्यांच्यावर शालेय शिक्षण विभागाचे कोणती नियंत्रण नाही याचाच फायदा घेऊन शाळेकडून अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने शुल्काच्या नावाखाली पैसे उकळण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचे ऐकिवात आहे या पार्श्वभूमीमुळे शाळेच्या या लुटीच्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी प्रकर्षाने पुढे येत आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने बाहेर उभे करणाऱ्या दीड शहाण्या कर्मचाऱ्याला संस्थाचालकाची मुकसंमती आहे का?? किंवा आशीर्वादाने मिळालेले मुख्याध्यापक सुद्धा त्या झारीतील शुक्राचार्य असणाऱ्या कर्मचाऱ्याला पाठिंबा देतो का हा सुद्धा प्रश्न पडतो तसेच संस्थाचालक सुद्धा आपल्या जवळच्या नंदी बैलासारखी मान डोलावणाऱ्या आपल्या मित्र-मैतराला मुख्यध्यापक करतात पण त्यांना माणुसकी किंवा आदरयुक्त संवाद कसा साधावा हे सुद्धा माहीत नसते व माणुसकी व आदर हे कोणत्या विद्यापीठात विकत किंवा खिरापतीच्या स्वरूपात वाटत नसतात ते गुण उपजतच असायला हवे पण उठोळपणाचे गुण अंगीकृतच असतात तसेच इंग्रजी सीबीएससी माध्यमांच्या शाळेत इतर संस्थांचे कर्मचारी सुद्धा समितीमध्ये राहून गाडा हाकण्याचे काम करत आहेत तेव्हा अशा गाडा हाकणाऱ्या व कमाई करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध संबंधित संस्थाचालकाने कारवाई करायला पाहिजे अशा प्रकारची खमंग चर्चा परिसरात आहे. ज्या संस्था स्वयंअर्थसहाय्य रहित असतील तरी भारतीय संविधानानुसार चालणाऱ्या घटनात्मक बाबीच्या परवानग्या नक्कीच घेतल्या असतील तेव्हा संस्थाचालकांनी संस्थेची मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता समजून चालणार नाही ती सर्व पालकाची संपत्ती आहे मग असे असताना संस्थेच्या मोटर गाड्या शुभ प्रसंगानुसार बाहेर भाड्याने जातात कशा हा सवाल पालक वर्ग करतो आहे अनेक इंग्लिश शाळा गावाबाहेर असतात त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ने आन करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतात ते मोटरगाड्या आणि विद्यार्थी यांचा जीवनाशी कुठेतरी निगडीत संबंध येतो कारण या मोटरगाड्या अशा बाहेरील ठिकाणी भाड्याने जात असतील तर वाहने नक्कीच खराब होऊन येणाऱ्या काळात अपघात सुद्धा घडू शकतो किंवा खराब होण्याचे प्रमाण वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून भरमसाठ ही वाढवायची संस्थाचालक कमाई करतात पण त्याचा भुर्दंड सर्वसामान्य पालकावर का हा पण इथे प्रश्न सर्वसामान्य पालकांना पडतो आहे.