
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब :-आदिवासी समाज संघटना, सरपंच संघटना, बौद्ध धम्म परिषद , सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने निवडून आलेले नवनियुक्त संचालक व नवनियुक्त सरळ सेवा निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभ आज मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ रोजी सावरगाव ता. कळंब येथे राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रा.वसंत पुरके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब दरणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालिका सौ.मिनाक्षीताई वेट्टी, संचालक अशोकराव मंगाम,उपसभापती महादेवराव काळे,
गजाननजी पंचबुद्दे, सौ.संजिवनीताई कासार प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात स्वप्नील जनार्दनजी कोराम,यश जिवनराव राजुरकर,
अभय उत्तमराव खैरकार,कु.राणी ज्ञानेश्वरराव कांबळे, शुभम किसनाजी चहारे,हरिश गजाननराव ढोले,प्रथम प्रदिपराव डबले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या महामंडळावर नव्यानेच संचालक पदी निवडून आलेल्या मिनाक्षी ताई वेट्टी व अशोकजी मंगाम यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात प्रशांत वाघमारे,अनिल घोटेकार,सचिन दरणे,राहूल सोनाळे, नारायणराव पिसे, आरती जगताप , अशोक उमरतकर, शरद घोसले ,रमेश झांबरे ,यांच्या सह अनेक मान्यवर , कार्यकर्ते उपस्थित होते.
