प्रशासकाच्या काळात पुसद नगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्याला सादर

प्रशासक एस.कार्तिकेयन व न.प.मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांचे नागरिकाकडून कौतुक


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


पुसद नगर परिषदेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. दि.१ एप्रिल २०२३ रोजी १० कोटी ४४ लाख ५६ हजार ५३२ रुपये प्रारंभिक शिल्लक अपेक्षित करण्यात आली आहे. तर ११७ कोटी ३१ लाख २४ हजार १६४ महसुल जमा शिल्लक दाखविण्यात आली आहे.सन २०२३-२०२४ करिता ५३ कोटी ८२ लाख ५४ हजार ६९७ रूपये आहे. तर भांडवली खर्चामध्ये ७३ कोटी २३ लाख ५ हजार ३६४ रूपये अपेक्षित आहे.जवळपास १२७ कोटी पाच लाख ६० हजार ६१ रुपये एकूण खर्च दाखविण्यात आला आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.नगर परिषदेचे प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस.काम करत असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड हे देखील कामकाज पहात आहे.दोघांनी अर्थसंकल्प तयार करून घेण्यासाठी लेखापाल अशोक सरकुंडे यांची मदत व परिश्रम घेतले होते.

नगरपालिकेकडे दि.३१ मार्च २०२४ ला ७० लाख २० हजार ६३५ रुपये शिल्लक अपेक्षित आहे.कराद्वारे नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर पाच कोटी,शो टॅक्स दोन लाख तीस हजार, जाहिरात कर १ लाख ५० हजार रुपये,वृक्ष कर १९ लाख रुपये, पाणी कर व पाण्यावरील विशेष करापोटी ३ कोटी १४ लाख ८० हजार रुपये अपेक्षित आहे. अग्निशमन विभागामधील करा पोटी ३८ लाख असे एकूण ८ कोटी ७५ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिळणाऱ्या महसूल विभागामध्ये मुद्रांक शुल्क २१ लाख,जमीन महसूल, शेतसारा अनुदान दोन लाख रुपये,न.प. सहाय्यक अनुदान २५ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये असा एकत्रित २६ कोटी २१ लाख ४० हजार रुपये प्राप्त होतील असा अंदाज प्रशासकाने व्यक्त केला आहे.महसुली अनुदाना,अंशदान व अर्थसहाय्यांमध्ये ११ कोटी ७३ लाख अपेक्षित आहे.न.प. मालमत्ता कर,भाड्यापोटी मिळणारे उत्पन्नात १ कोटी ३८ लाख रुपये आहे.त्यामध्ये दुकान भाडे ८० लाख,जागा भाडे २८ लाख,आठवडी बाजार ठेका वसुली भाडे १३ लाख,दैनिक बाजार ठेका १७ लाख रुपये मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.नगर परिषदेमध्ये लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने सर्व समस्या सोडविण्याची जबाबदारी ही प्रशासक व मुख्याधिकारी यांच्यावर येत आहे.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मागील एक वर्षात मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड हे कामकाज पहात आहे.

बॉक्स १
यासाठी देखील निधीची तरतूद

शहरातील विविध प्रभागांमध्ये नाल्यांचे बांधकाम करण्याकरिता एक कोटी रुपये पूर प्रतिबंधक बांधकामासाठी एक कोटी रुपये हाय मास्टर दिव्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित केला आहे.दि.१ जानेवारी २०२२ पासून नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.त्यांच्या काळात तीन सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक मंजुरीसाठी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करण्यात आले आहे.वर्षभरात विविध मथळ्याखाली १२७ कोटी ७५ लाख ८० हजार ९९६ रुपये महसूल प्राप्त होईल असा अंदाज वर्तविला असून चालू वर्षात १२७ कोटी ५ लाख रुपये महसूली व भांडवल खर्च अपेक्षित आहे. खर्च वजा जाता नगरपालिकेला ७० लाख २० हजार ६३५ रुपये शिल्लक राहील असा अंदाज वर्तविला दिला आहे.