
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मुधापुर ते पारडी पादंन रस्ता खडीकरण करण्यात यावा यासाठी 15 आॅगस्ट पासून मुधापुर येथे आमरण उपोषणाला सुरवात,
राळेगाव तालुक्यातील मुधापुर हे छोटेसे गाव या गावातील लोक सख्या जवळपास 584 ईतकी आहे, मुधापुर हे गाव परसोडा, रोहणी गट ग्रामपंचायत आहे मात्र या गावाकडे कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे, मुधापुर व पारडी हा पादंन रस्ता जवळपास दोन ते अडीच किलो मीटर आहे मात्र या रस्त्यातून साधा मनुष्य जाउ शकत नाही मुले शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते मुलाने शिक्षणासाठी जायचे कशे हा मुधापुर वासीयाना पडला आहे, जो पर्यंत पारडी मुधापुर रोड होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे सांगितले आहे, अनेक वेळा निवेदन देऊन सुध्दा आमचा छोटा गाव असल्याने लक्ष देण्यात येत नाही, लोकप्रतिनिधी फक्त निवडनुकिच्या वेळी येतात मात्र बाकी दिवस त्यांना फुरसत मिळत नाही असे गावकऱ्याचे म्हणने आहे मात्र जो प्रर्यत मुधापुर येथील समशा निपटारा होत नाही तो प्रर्यत उपोषण सुटनार नाही असे उपोषण कते यांनी सांगितले, उपोषणाला बालाजी देठे उपसरपंच परसोडा, सोनु वसंतराव आत्राम सदस्य, सौ. वृंदा गणेश मेश्राम सदस्य ग्रामपंचायत मुधापुर, सौ. ताईबाई उईके ग्रा. सदस्य परसोडा हे उपोषणाला बसले आहे.
