साखरा (दरा) येथे निराधार शिबिरात २४ लाभार्थ्यांचीआधार

वणी :- तालुक्यातील शेवटचं टोक मौजा साखरा ( दरा) येथे निराधार मार्गदर्शन शिबिर काल ता. ५ मार्ज रोजी हनुमान मंदिराच्या सभागृहात संपन्न झाले असून या शिबिरात २४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमांतर्गत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे अध्यक्षतेखाली सदरचे शिबिर संपन्न झाले असून या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते आशिष मोहूर्ले, नंदकुमार अंबोरे यांनी केले होते तर या शिबिराला ग्राम पंचायतचे सरपंच रवी ठाकरे, उपसरपंच विनायक कांडारकर आदींनी सहकार्य केले तर अंकुश घुगुल, विजू ठाकरे, खिमेश जगनाडे,दीपक कोवे, भगवान चंदनकर आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रवंदना घेऊन शिबिराचा समोरोप करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायतीचे सर्व कामकाम राष्ट्रावंदना घेऊन सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच रवी ठाकरे यांना देण्यात आले.