कारेगाव गावाचे पुनर्वसन करा. सामाजिक कार्यकर्ते अनिल नंदुरकर यांचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि 3 जुलै रोजी दुपारी 1 वाजता विधान भवन मुंबई येथे राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीय कारेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल नंदुरकर यांनी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली व राळेगाव तालुक्यातील पुरपीडित असलेल्या कारेगाव गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात निवेदन दिले व यावेळी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तात्काळ निवेदनावर सही करुन लवकरच गावाचे पुनर्वसन करू असा शब्द दिला.
