धावती जीवनशैली::योग प्राणायाम याकडे लक्ष देणे गरजेचे


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


भारत देशामध्ये योगा आणि प्राणायाम यास मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले व तत्कालीन काळात अत्यंत प्रभावशाली जीवनशैली या योग अभ्यासातून पुढे आली परंतु मधल्या काही कालावधीत संस्कृतीने पाश्चात्य संस्कृतीच्या मागे धावत गेल्याने योगा आणि प्राणायाम याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केल्याचे जाणवते. याचा परिणाम म्हणजे सध्या अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ बालकांसहित ज्येष्ठ तरुण यांना सुद्धा समस्यानी जडलेले दिसते अनेक गंभीर आजार उद्भवत असून या पासून सुटका रोगमुक्त होण्यासाठी नागरिकांनी नियमित योगा आणि प्राणायाम अत्यावश्यक बनले आहे. आपल्या शरीराची रचना ही सुदृढ व धष्टपुष्ट व निरोगी ठेवून चित्ताची एकाग्रता आणि मनाला शांती याचा लाभ घ्यावयाचा असल्यास योग आणि प्राणायाम शिवाय पर्याय नाही हे ध्यानात घेतले पाहिजे योग गुरु बाबा रामदेव यांनी केवळ भारतानेच नाही तर इतर खंडातील देशाने सुद्धा आभारच मानले पाहिजेत कारण योगा पूर्वी काळापासून जरी प्रचलित असला तरी तो बाबा रामदेव यांनी पुनर्जीवित करण्याचे काम केले त्यांची सेवा समितीच्या मार्फत हे काम घडून आणले म्हणूनच देशात विविध भागातील म्हणजे त्यांचे सदस्य योगाचा प्रचार प्रसार आणि कष्ट घेताना दिसत आहेत त्यामुळे आणखीन एक वेळ देशवासीयांना योग शास्त्राचे महत्व सांगले असून अनेक लोकांनी आता आपल्या जीवनात योगाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे परंतु अजून अनेक लोक याकडे वळलेले दिसत नाहीत. दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून उपचार घेण्यापेक्षा योग करून होणारा आजार टाळून निरोगी राहणे कधीही चांगले आहे म्हणून आता योग प्राणायामा करण्यास महत्त्व दिले पाहिजे. आता हळू हळू परिवर्तन होताना दिसत असून लहान लहान बालके योगा आणि प्राणायांमाकडे वळून कसरती करताना दिसत आहेत.