
प्रतिनिधी//शेख रमजान
मोटार सायकलच्या अपघातात एक जण मृत्यू त्तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील बिटरगाव बु येथील पुलाजवळील सती माय मंदिरा जवळ घडली . यात एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहे . या अपघातात बजरंग लखन सिंग बरदावळ (25) याचा मृत्यू झाला असून सुभाष लक्ष्मण देवकर व देवानंद मनदुमलेवाड गंभीर जखमी असून त्यांना ढाणकी येथील प्रा. आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
मृतक लखनसिंग बरदावळ यांच्या काकाला त्यांचा पुतन्या नामे-बजरंग लखनसिंग बरदावळ वय अं-25 वर्षे यांची मृत्यु झाल्याची माहीती मिळाल्यावर त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे समोरून येणाऱ्या मोटार सायकल क्रंमाक एम एच-22/8831 चेसीस क्रं-(00G20C03255) चे मोटर सायकल चालकांने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवून ठोस मारून अपघात झाल्याने डोक्याला व शरिराला जबर दुखापत झाल्याने त्याच्या पुतन्याचा अपघातात मूत्यु झाला त्याचे मृत्युस नमुद मोटार सायकल चालक हा कारणीभूत असल्याने त्याचे विरूद्ध कायदेशीर कार्यवाही होणे करिता त्यांनी जबानी रिपोर्ट दिले आहे .
