
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिक पध्दती, कालव्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, आणि पाणी वापर संस्थेच्या कामकाजाचा अभ्यास केल्यास बेंबळा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पनात आमुलाग्र बदल होईल असा सूर पाणी वापर संस्था अभ्यास दौऱ्यातून उमटला. राळेगाव तालुक्यातील शेतकरी यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश होता.प्रधानमंत्री कृषी सिचाई योजनेंतर्गत
जिल्ह्यातील बेंबळा पाणी वापर संस्थेचे संचालक असलेल्या शेतकऱ्यास्राठी आयोजित हा अभ्यास दौरा होता.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक विभागाच्या वाघाड प्रकल्पांतर्गत प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थाचे आदर्श उदाहरणाचे अंक्लंब यवतमाळ जिल्ह्यात व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेल्या निर्देशानुसार बेंबळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड आणि प्रकल्पाची अमंजबजावणी करणाऱ्या
संस्थेचा प्रमुख प्रियका पाटील, सचीव मनिष भानवे यांनी या महत्त्वाकाक्षी क्षेत्रीय भेट व अभ्यास दौऱ्याऱ्यांचे चार टप्प्यात आगोजन केले पहिला अभ्यास दौरा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे २०० शेतकऱ्यांना वाघाड प्रकल्प आणि जल व भुमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद येथे चार टप्प्यात प्रशिक्षण व अभ्यास दौरा केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पिकपध्दती आणि पाणी व्यवस्थापनामुळे शेतीचे उत्पादन
विदभों पेक्षा मोठ्या प्रमाणावर आहे, याच व्यवस्थापनाचा फायदा बेंबळा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्या बेंबळा उपविभागाचे सहाय्यक अभियंता आशुतोष उमेकर, प्रकल्प
व्यवस्थापक मनोज पवार, कनिष्ठ अभियंता मयुर राजणे, सुधीर जवादे, सेवा निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मेधावत, प्रवीण प्रशिक्षक रुपाली जाधव, डॉ. शुभांगी भोक्टे, मोहन लिहीतकर, परमेश्वर आडे ईत्यादीनी सहभाग घेतले आहे.
बॉक्स 👇🏼
बेंबळा प्रकल्पाचे कालव्यामधून मोठ्या प्रमाणात सिंचन होते मुख्य कालवा उपमुख्य कालवा लघुपाठ आणि पाठचाऱ्या माध्यमातून सिंचनाचे साठी पाणी सोडले जाते या पाण्याचा योग्य प्रकारे वापर व्हावा आणि पाणी आणि धरण हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असावे हा विचार घेऊन या सर्व कालव्यावर पाणी वापर संस्था तयार झाले यामध्ये जवळपास 118 संस्थांची निर्मिती झालेली आहे. अभ्यास दौऱ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तालुका दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाचे प्रकल्प स्तरीय पाणी वापर संस्था व त्यांचे कार्य यांचा अभ्यास आणि माहिती दौऱ्यामधील सर्व पाणी वापर संस्थेच्या संचालकांना देण्यात आली तसेच क्षेत्रीय भेट म्हणून शेतकऱ्यांनी निर्मित केलेली सह्याद्री हा कृषी फार्म दाखवण्यात आला त्यानंतर औरंगाबाद येथील शासनाच्या वाल्मी भूमी व जल ही संस्था या संस्थेमध्ये अभ्यासवर्ग घेण्यात आला शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या कार्यक्रमाचे हे शेतकरी म्हणून मी मनापासून समाधान व्यक्त करतो व शासनाच्या
खरोखरीच अशा ज्या शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा योजना प्रत्यक्षात अमलात आणाव्यात शेतकरी जमीन व पाणी यांचा उपयोग योग्य प्रकारे करू लागला तर कमी पाण्यातही योग्य ते उत्पादन घेता येईल .
सुधीर जवादे
किन्ही ( ज ), राळेगाव
