कृषी विभागाचे वराती मागून घोडे
कृषी विभागाच्या योजना ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोके दुःखी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका कृषी विभागाचा गलथान कारभार चवाट्यावर आला असून या विभागाने शेतकऱ्यांची एकप्रकारे टिंगल केल्याचे दिसत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर खरीप हंगामाच्या सुरुवातीला महाडिबीटी द्वारे कृषी फवारणी पंप कापूस गोळा साठवणूक बॅग नॅनो युरिया व नॅनो डिएपी साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते मात्र त्यावेळी ही साईड पूर्णपणे नादुरुस्त स्लो होती वारंवार अर्ज करण्याची मुदत वाढवूनही साईड च चालू बंद असल्यामुळे अर्ज येत नव्हते व शेतकरी वंचित राहील या उद्देशाने कृषी विभागाने ऑफलाईन अर्ज मागितले होते यामध्ये हा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नावाने करावयाचा होता. यामध्ये तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अर्ज केला होता तालुका कार्यालयामध्ये अर्जाचा ढीग लागला होता. यामध्ये ही लॉटरी पद्धतीने या साहित्याचे वाटप होणार असल्याचे सांगितले होते मात्र शेतकऱ्यांना फवारणी पंप लागणार ही अपेक्षा असताना तसें न करता कोणाच्या इशाऱ्यावर या पंपाचे वाटप ऑफलाईन अर्ज करणाऱ्यांना की ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना वाटप केले हे अर्ध्या अधिक शेतकऱ्यांना माहिती पडले नाही नाममात्र शेतकऱ्यांना sms द्वारे सूचना देऊन पंपाचे वाटप करण्यात आले त्यामुळे या पंप वाटपामध्ये मोठया प्रमाणात घोळ झाल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे तर यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना इतर साहित्याचे त्याच वेळी वाटप करणे गरजेचे असताना तसें न करता आत्ता फवारणी चा हंगाम व कापूस वेचणी चा हंगाम गेल्यावर नॅनो युरिया एक बॉटल व नॅनो डिएपि व एक कापूस साठवणूक करण्याची बॅग वाटप करत आहे हे साहित्य वाटप करण्यासाठी आत्ता काही सहायकांनी पुढाकार घेतला असून हे साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावत असून आधीच वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांना शे पाचशे च्या साहित्यासाठी दिवसभराचे काम बुडऊन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे टिंगल करण्यात येत असून कृषी विभाग मात्र वाटेल तेव्हा आपल्या मनमर्जीने साहित्य वाटप करत असल्यामुळे वाराती मागून घोडे असल्याचे यावरून दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण कृषी साहित्य वाटपाची चौकशी करावी अशी मागणी सुज्ञ शेतकऱ्यांकडून होत आहे.

कृषी सहाय्यक पाहतात तालुक्याच्या ठिकाणावरून कारभार ?
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने पाहिजे तेव्हा शेतीच्या बांधावर योग्य माहिती मिळावी आणि कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहोचाव्या व यातून शेतातील उत्पन्न वाढून आर्थिक प्रगती वाव्ही या उद्देशाने संबंधित विभागाने कृषी सहायकांची नेमणूक केली मात्र याला राळेगाव तालुका कृषी विभाग अपवाद ठरत असून तालुक्याच्या ठिकाणावरून संपूर्ण कारभार पाहत असून एखाद्या शेतकऱ्याला सहायकाची गरज पडल्यास तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कामे करून घ्यावी लागत असल्याचे बोलल्या जात आहे तर यातील काही खेडे गावातील सहाय्यक तर जाण्यायेण्यासाठी मोटार सायकल वाहन व पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नसल्याचे बोलून दाखवितात तर काही सहाय्यक रोजच नॉटरिचेबल राहत असल्यामुळे या विभागाचा संपूर्ण कारभार रामभरोसे चालत असल्याचे या सर्व बाबीवरून दिसते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नोकरी खेड्यात व राहणे शहरात
कृषी विभागातील सहाय्यक हे गावखेड्यात नोकरीं असल्यामुळे त्याच ठिकाणी मुख्यालय दाखवून शासनाच्या घरभाड्यासह इतर सोईचा लाभ घेतात मात्र राहने शहराच्या ठिकाणी असून यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांची दिशाभूल होत असल्यामुळे याची ही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.