
उमरखेड .सामाजिक वनीकरण विभाग यवतमाळ यांच्याकडून इ वर्ग जमिनीवर वृक्ष लागवड करून ग्रामपंचायत धानोरा यांना हस्तांतरण करण्यात आले
सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने 2020 मध्ये दोन हेक्टर मध्ये मिश्र वृक्षलावगण करून त्यामध्ये ू चिंच वड आंबा बांबू अशा विविध प्रकारच्या झाडाची लागवड केली व त्या झाडाची तीन वर्ष सुंदर अशी जोपासना करून आज दिनांक 28 4 2023 रोजी ग्रामपंचायत धानोरा साचलदेव यांना हस्तांतरण करण्यात आले यावेळेस बोलताना अरबी सोनवणे साहेब म्हणाले आम्ही जे मागील तीन वर्षांमध्ये नंदनवन केलं हिरवागार शिवार केला आहे तेच कार्य यापुढे ग्रामपंचायत करेल अशी अशा व्यक्त साहेबांनी केली ई वर्ग जमिनीवर शासकीय मॉडेलवर दोन बाय दोन अशा वृक्ष लागवड करून भविष्यामध्ये गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल लिंबाचे झाडे औषध उपचारासाठी आंब्याची झाडी फळासाठी सुद्धा हे फायदा होईल असे मत इंगोले मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्त केली यावेळी धानोरा गावचे सरपंच प्रकाश जाधव उपसरपंच अवधूत हमांद बंडू हुलकानी वनसेवक तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी काळे ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे ग्रामपंचायत सचिव गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
