बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जागा वाटपाचा तिढा कायम

सहसंपादक : :- आशिष नैताम

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या उमेदवारीचा प्रबळ दावा ठोकणारे संतोष रावत, अखरेच्या क्षणी धावपळ होवू नये म्हणून, कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यांने, राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रावत आणि रावत समर्थक हे आपल्यालाच कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार यावर ठाम असून, भव्य रॅली काढून, कॉंग्रेसच्या एबी फार्मसह आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यांची तयारी ते करीत आहेत. रॅली भव्य—दिव्य कशी निघेल याचे नियोजन संतोष रावत समर्थक करीत आहे. संतोष रावत समर्थकांनी मागील काही महिन्यापासून बल्लारपूर निर्वाचन क्षेत्र काँग्रेसने करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, त्याचे फळ त्यांना उमेदवारी बहाल करून मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कॉंग्रेसकडून दुसरे इच्छुक उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यानी आपली आशा आणि दावेदारी कायम ठेवली आहे. अखरेच्या क्षणी आपल्यालाच न्याय मिळेल, अशी त्यांना आशा आहे. ‘एकच आशा, डॉ. अभिलाषा’ असे त्यांचे समर्थकांना अजूनही वाटते. मात्र कालच्या घडामोडीने डॉ. गावतुरे यांचे समर्थकांतही संताप व्यक्त होत असल्यांचे ‘डॉ. अभिलाषा गावतुरे समर्थक’ या व्हाट्सअप ग्रुपवर दिसून आले. कॉंग्रेसने तिकीट नाकारणे हा अन्याय असून, त्या विरोधात लढले पाहीजे, प्रसंगी अपक्ष लढून आपली ताकद दाखवून दिली पाहीजे असे अनेक समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केले आहे. ‘अभिलाषा ताई के साथ अन्याय, अब जनता दिलाएगी न्याय’ अशा शिर्षकाचे पोष्ट समाजमाध्यमावर प्रचंड वायरल होत आहे. ‘भ्रष्टाचारी नेताओ को बाय—बाय, पढी लिखी अभिलाषा को लाए’ असे म्हणत कार्यकर्ते डॉ. गावतुरे यांचेसाठी आग्रही आहेत.

बल्हारपुर मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा ‘फालुदा’ झाल्यांचे चित्र असून, आज—उद्या नेमके चित्र स्पष्ट होईल, असे तिनही उमेदवारांचे समर्थक दावा करीत आहे.

महाविकास आघाडीत अशी बिघाडी असतांनाच, दुसरीकडे आपल्या विजयाच्या आशेने निश्चिंत झालेले भाजपाचे उमेदवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्हारपुर मतदार संघात आपला ‘सेटअप’ व्यवस्थित करून, चंद्रपूरातून आपले समर्थक कार्यकर्ते ब्रिजभुषण पाझारे यांचे उमेदवारीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात व्यस्त झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरची विधानसभेची जागा, भाजपाने विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांना न देता, पंचेवीस वर्ष पक्षासाठी मेहनत करणारे कार्यकर्त्याला द्यावी यासाठी ते दिल्लीवारी करीत आहे.