
सहसंपादक : रामभाऊ भोयर
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या राज्यशासनाच्या अभिनव योजनेत राळेगाव तालुक्यातील अनेक शाळांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. तालुक्यातील राळेगाव केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सावंगी शाळा नेहमीच अग्रेसर असते. शाळेतील विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचे विचार रुजविण्यासाठी विविध संस्थांची माहिती व कार्य समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रयत्न केले जातात. प्रत्येक उपक्रमांची नोंद घेतली जाते. दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न लिहिणे व समजून घेणे, महाराष्ट्र राज्य संस्कृती दर्शन संग्रह, यवतमाळ जिल्ह्यातील विविध शहरांचा इतिहास संग्रह, मला व्हायचं अंतराळवीर, विज्ञान प्रदर्शनात सहभाग व प्राविण्य,माता पालक मेळाव्याचे आयोजन, गुणवत्ता संवर्धनासाठी विशेष प्रयत्न अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीनेही मेरी मिट्टी मेरा देश, अमृतकलश इत्यादी उपक्रमाचे कौतुक केले.
, राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार साहेब यांनी शाळेचे परिक्षण केले व यथोचित मार्गदर्शन केले.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी .चंद्रभान शेळके व केंद्रप्रमुख महेश सोनेकर यांनी प्रोत्साहित केले.
सावंगी ग्रामपंचायत सरपंचा सौ.बबिताताई अक्कलवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वैशाली सहारे, उपाध्यक्ष अतुल बेडदेवार, नंदा मिसेवार, शुभांगी मेहरे, पायल वानखेडे, सोनाली तुळसकर, गजानन कोवे, गजानन सूरकर, राजेंद्र ओंकार, दिलीप कोवे, दत्तात्रय किन्नाके इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे, मंगला आगरकर, रेखा कोवे अर्चना सुरजुसे, सोनल नासरे, मंदाबाई तातेवार यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेचा सन्मान वाढविला.
