
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- २३ सप्टेंबर.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षाचे हात बळकट करण्यासाठी पूर्व विदर्भ युवासेना सचिव शुभम नवले,युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, यांच्या मार्गदर्शनात युवासेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांच्या आदेशानूसार युवासेना पोंभुर्णा तालुका प्रमुख रजत ढोंगे यांच्या नेतृत्वात पोंभुर्णा येथील शासकीय विश्रामगृहात युवासेनेची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. युवासेना आढावा बैठकीत अनेक युवकांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करत, पक्षाचा प्रसार करण्याचा दृढनिश्चय करत येणाऱ्या काळात पक्षासाठी अहोरात्र झटण्याचा निश्चय केला.
या कार्यक्रमाला शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,शिवसेना तालुका प्रमुख पंकज वड्डेटीवार, शिवसेना शहर प्रमुख संतोष पार्लेवार, व्यंकटेश चिपावर,सतीश बावने,रमेश कुळमेथे,वेदप्रकाश आगरकर, इत्यादींची उपस्थिती. कार्यक्रमस्थळी उपस्थितीत तालुक्यातील सर्व मान्यवरांनी एकजुटीने कसे काम करता येईल, या साठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवाकार्यकर्ते सुनिल कावटवार यांनी केले. यावेळी युवासेनेचे राहुल गडपल्लिवार,प्रफुल गवारे,राकेश गाडेकर,अरविंद कोडापे,मयूर गाडेकर,अनुराग बघेल,रोहन आत्राम,योगेश पिपरे,संकेत मडावी,प्रज्वल जाधव,अविचल जाधव,साहिल तलांडे,आदी युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.
