वनोजा शाळा ठरली तीन लाखाची मानकरी
राळेगाव तालुक्यात प्रथम – ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात सत्र 2023-24 मध्ये बाजी-

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या उपक्रमाच्या तालुकास्तर मूल्यांकनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून सर्वाधिक गुण घेऊन राळेगाव पंचायत समिती अंतर्गत वनोजा येथील जि.प.उ.प्रा. सेमी इंग्लिश मिडियम शाळा प्रथम आली. ही शाळा तीन लाख रुपये बक्षिसास पात्र ठरली.

तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने, केन्द्रस्तरीय समितीने केन्द्रातून प्रथम ठरविलेल्या शाळांची तपासणी 30 मुद्यांच्या आधारे केली त्यामध्ये वनोजा शाळेला उपलब्ध सुविधांच्या आधारावर निकषावरून गुणांकनामध्ये प्रथमस्थान प्राप्त झाले. त्याबद्दल गटविकास अधिकारी केशव पवार,गटविकास अधिकारी पद्‌माकर मडावी, गटशिक्षणाधिकारी चंद्र‌भान शेळके, केन्द्रप्रमुख सुभाष पारधी यांनी शाळेचे कौतुक केले.

वनोजा शाळेत सर्व सुविधा असून विद्यार्थी हिताचे उपक्रम वनोजा शाळेमध्ये राबविले जातात.

ग्रामस्थांच्या पाठबळाने(एक लाख रुपये) व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने तसेच मु.अ. व सर्व शिक्षकांच्या नेतृत्वाने शाळा प्रग‌तीपथावर जात आहे. त्याकरिता श्री मोरेश्वर वटाणे अध्यक्ष, सौ.सविता उईके मुख्याध्यापिका, श्री सुनिल मेश्राम स.अ. ,सौ. स्वाती तायडे स.अ.,श्री. अमोल भोयर विषय शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपशिक्षणाधिकारी (माध्य.)मा.श्री. गोडे साहेब,उपशिक्षणाधिकारी(प्राथ.) मा.निता गावंडे मॅडम यांनी शाळेची जिल्हास्तरीय तपासणी केली.