
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना मुख्य पक्षनेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे व यवतमाळ जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.संजयभाऊ राठोड यांच्या कार्याला प्रेरित होऊन व शिवसेना संपर्कप्रमुख हरीहरभाऊ लिंगनवार, विधानसभा समन्वयक जानरावजी गिरी शिवसेना तालुका प्रमुख मनोजभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करण्यात आला,यवतमाळ जिल्हा पालकमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांची काम करण्याची शैली आणि 80% समाजकारण आणि 20%राजकारण या कार्यपद्धतीने भारावून हा प्रवेश झाला असल्याचे मयुर जुमळे यांच्या कडून सांगण्यात आले,मयुर जुमळे यांचा प्रवेश होताच तालुक्यात असेलेला दांडगा जनसंपर्क युवकांमध्ये असलेली ओळख या सर्व गोष्टी मुळे त्यांना युवासेना तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली,या निवडीचे सर्व श्रेय शिवसेना राळेगाव विधानसभा समन्वयक जानरावजी गिरी,शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख मनोजभाऊ भोयर,युवासेनेचे योगेशभाऊ ठाकरे यांना दिले,मयुर जुमळे यांच्या नियुक्ती सोबतचं राळेगाव युवासेना विधानसभा प्रमुख पदी ॲड.योगेशभाऊ ठाकरे,शिवसेना तालुका संघटक पदी समीर येरेकार, राळेगाव शहर प्रमुख पदी निखिल कोवे,शिवसेना उपतालुका प्रमुख पदी अक्षय भोकटे, शिवसेना उपतालुका प्रमुख पदी मयुर तिवाडे,उपतालुका प्रमुख गजानन बुटे, विभाग प्रमुख वाढोणा पं.स.सर्कल पदी आदेश शिंदे, कुणाल हरबडे विभाग प्रमुख खैरी पं.स.सर्कल पदी,विभाग प्रमुख वरध पं.स.सर्कल पदी किशोर कुळसंगे,विभाग प्रमुख झाडगाव पं.स.सर्कल पदी प्रणय भुडे,विभाग प्रमुख धनोरा पं.स.सर्कल पदी लोकेश घोडे,विभाग प्रमुख जळका पं.स.सर्कल पदी पवन महाजन यांची पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करून सर्व महत्वाच्या पदावर निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या निवडीचे तालुक्यातुन खुप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
माझ्या सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून युवासेना तालुका प्रमुख पदी निवड केली व माझ्या सारख्या सामान्य गरीब घरातील मुलाला आज इतकी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील, आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही व युवासेना झपाट्याने वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करीन,यांनतर कोणत्याही विध्यार्थी तसेच युवकांवर अन्याय होणार नाही
मयुर जुमळे युवासेना राळेगाव तालुका प्रमुख