होमगार्ड च्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण ,पवनार धाम नदी पात्रातील गायमुख कुंडातील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

रविवार रोजी ऋषिपंचमीनिमित्त हजारोच्या संख्येने महिलांची धाम नदीवर पूजा व आंघोळी करीता अफाट गर्दी जमली असता धाम नदी कुंडावर आंघोळी करीता गेलेल्या उज्वला दिलीप लोणारे यांचा तोल गेल्याने त्या गायमुख कुंडात पडल्या असता कर्तव्यावर तैनात असलेल्या होमगार्ड सैनिक नीकेश म्हैसकर व सोनू मुंगले यांनी आपल्या जीवाची पर्वा करता दुथडी भरून वाहत असलेल्या नदी पत्रात जावून महिलेचा जीव वाचवला सदर घटना 12 वाजून 30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली मात्र होमगार्ड सैनिकांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने सोनू मुंगले व नीकेष म्हैसकर यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहे. पवनार धाम नदी हि उतर वहिनी असल्याने या ठिकाणी विविध प्रकारची प्रकारची पूजा अर्चा होत असते त्या तसेच धाम नदी तीरी प्राचीन शिव मंदिर असल्याने नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आज ऋषिपंचमी असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील उज्वला दिलीप लोणारे या महिलेसह अनेक महिला धाम नदी पात्रातील गायमुख कुंडाजवळ आंघोळ करून पूजा पाठ करीत असताना सदर महिलेचा तोल जात गायमुख कुंडात पडली असल्याने एकच गोंधळ उडाला उज्वला दिलीप लोणारे वय 55 वर्ष असे पीडित महिलेचे नाव असून सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर हजर असलेल्या होमगार्ड सैनिक निकेष म्हैसकर सोनू मुंगले यांनी घटनेचे तत्काळ गांभीर्य लक्षात घेता घटना स्थली धाव घेत कुंडात पडलेल्या महिलेचा जीव वाचवला
या मुळे उपस्थित महिला व नागरिकांकडून होमगार्ड सैनिकांचे आभार व्यक्त केले
होमगार्ड सैनिक हे सदैव इमानदारीने आपले कर्तव्य बजावत असतात मात्र शासनाच्या उदासीन धोरणांमुळे होमगार्ड सैनिकांचे मनोधैर्य खचत चालले असल्याचे होमगार्ड सैनिकांकडून बोलले जात आहे वर्षातून केवळ 60 दिवसच काम मिळत आहे
उर्वरित दिवस कामासाठी भटकंती करावी लागते त्या मुळे परिवाराचा उदर निर्वाह कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत आहे अनेकदा होमगार्ड सैनिकांकडून शासनास निवेदन दिले मात्र विसरभोळ्या शासनास जाग कधी येणार कळण्यास मार्ग नाही
शासनाने सहा महिने काम देवु तसेच मानधनात वाढ करू असे अनेकदा आश्वासन दिले कित्येक सैनिक कर्तव्यावर असताना अपघातात मरण पावले मात्र शासणा कडून अद्याप कुठलीही मदत किंवा त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने होमगार्ड सैनिक तीव्र रोष व्यक्त करत आहे
कर्तव्यावर असो किंवा नसो परंतु होमगार्ड सैनिक बऱ्याचदा आपले प्राण धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवत असल्याचे होमगार्ड सैनिक सांगत आहे या मुळे ग्रामस्थांकडून होमगार्ड सैनिकांचे आभार मानत आनंद व्यक्त करत आहे.
शासनाने होमगार्ड सैनिकांच्या समस्या कडे तातडीने लक्ष देवून कायम स्वरुपी करण्याची इच्छा देखील ग्रामस्थांन कडून दिसून येत आहे.