
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकताच 2026 मध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक आमदारकीच्या निवडूकीच्या अणूषंगाने आतापर्यंत झालेल्या मतदार नोंदणी संदर्भात आणि परत मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा सत्र यावर आधारित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सभा आर्णी येथील रेणुका मंगल कार्यालय माहूरे ले आऊट येथे दिनांक 16 नोव्हेंबरला संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार आदरणीय विश्वनाथजी डायगव्हाणे सर हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार संघटनेचे सरकार्यवाह श्री सुधाकरराव अडबाले सर हे उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या फोटो पुजनाने करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष पवन बन सर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.त्यानंतर अमरावती विभागातील शिक्षक भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री दिलीप भिमरावजी कडू सर यांना पसंती क्रमांक एकचे मतदान देऊन विजयी करण्याचे आवाहन सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय सुधाकरराव अडबाले सर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर सर यांनी सुध्दा खास शैलीत आपले विचार व्यक्त केले.सोबतच प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांनी सुध्दा संघटनेचे उमेदवार श्री दिलीप कडू सर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे असे आवाहन आपल्या भाषणातून केले. तसेच आय टी आय निर्देशक संघटनेचे पदाधिकारी भोजराज काळे सर व आश्रमशाळा संघटनेचे विभागीय पदाधिकारी श्री किशन पुंड सर यांनी सुध्दा आपली भूमिका स्पष्ट करून पाठिंबा जाहीर केला. सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार आदरणीय विश्वनाथजी डायगव्हाणे सर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.आणि परत एकदा कडू सर यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले.त्यावेळी मंचावर आदरणीय विश्वनाथजी डायगव्हाणे सर, शिक्षक आमदार आदरणीय सुधाकरराव अडबाले सर, प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर सर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप कडू सर म.रा.आय टी आय निर्देशक संघटनेचे सल्लागार भोजराज काळे सर म.रा.आश्रमशाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस किशन पुंड सर महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सदस्य आनंद मेश्राम सर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर कार्याध्यक्ष विजय खरोडे सर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय विसपुते सर आश्रमशाळा संघटनेचे पदाधिकारी भूपाल राठोड, बाबूराव पवार, जयदीप पवार नागोराव चौधरी सर, संतोष हेडाऊ सर, आर्णी तालुका अध्यक्ष श्री सोनल मोरे सर तालुका कार्यवाह श्री पलिकोंडावार सर यांच्या सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.या मेळाव्याचे सुत्रसंचलन वणीचे पदाधिकारी भुपेंद्र देरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तू महाकुलकर सरांनी केले. या जिल्हा मेळाव्यात यवतमाळ जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजिवन सदस्य यांच्यासह महिला भगिनी सुध्दा उपस्थित असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
