शालेय साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा

बालाजी भांडवलकर ( प्रतिनिधी उस्मानाबाद_ )

दि.०३सप्टेंबर २०२२रोजी जय हनुमान संघटना , मल्हार आर्मी संघटना संस्थापक अध्यक्ष लोकनेते श्री सुरेश (भाऊ) सुर्यकांत कांबळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत विविध उपक्रमाने जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला तसेच, वाटेफळ गावचे उपसरपंच संतोष भांडवलकर यांच्या संकल्पनेतून परांडा तालुक्यातील वाटेफळ ,श्रीधरवाडी ,ताकमोडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला यावेळी जय हनुमान संघटना ग्रुपचे वाटेफळ शाखेचे पदाधिकारी, मा.पं.स.दिपक भांडवलकर ताकमोडवाडी सरपंच,ग्रा. सदस्य युवराज भांडवलकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिंग भांडवलकर, रंजित भांडवलकर, सर्व सदस्य,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक दयानंद भांडवलकर खोत सर, तात्या हगारे ,महादेव गिरवले,पोपट कोकाटे संजय खरात मनोज भैय्या भांडवलकर ,धनराज भांडवलकर व विविध क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.