माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे विधान मंडळ, नागपूर येथे २०डिसें.ला धरणे/निर्देशने आंदोलन,विदर्भ माध्य. शिक्षक संघ आंदोलनात सहभागी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

                    राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रलंबित मागण्या व समस्यांच्या पूर्ततेसाठी *महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे महामंडळ अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही यू डायगव्हाणे* यांचे नेतृत्वात विधीमंडळ परिसर, यशवंत स्टेडीयम, नागपुर येथे मंगळवार दि. २० डिसेम्बर २०२२ ला ११ ते ४ या कालावधीत निदर्शने व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
                    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना व राज्यातील इतरही काही संघटना महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाशी संलग्न आहेत. त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना या आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे विमाशिसंघाच्या सर्व प्रांतीय, जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस. जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले यांनी केले आहे. 
                    राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याने, अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतुद करणे, रिक्त असलेली माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तात्काळ भरणे या व इतर अनेक प्रलंबित मागण्या व समस्यांच्या पूर्ततेसाठी हे राज्यस्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आले असल्यामु‌‌ले या आंदोलनात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मच्यार्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमा‌ल जिल्हाध्यक्ष अशपाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे यांनी केले असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी दिली आहे.

राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रलंबित मागण्या व समस्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे महामंडळ अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही यू डायगव्हाणे* यांचे नेतृत्वात विधीमंडळ परिसर, यशवंत स्टेडीयम, नागपुर येथे मंगळवार दि. २० डिसेम्बर २०२२ ला ११ ते ४ या कालावधीत निदर्शने व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.