
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नेताजी शिक्षण प्रसारक संस्था, राळेगाव आणि नेताजी विद्यालय यांच्या वतीने येत्या 21 डिसेंबर रोजी ‘माजी विद्यार्थी मेळावा – २०२५’ उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शाळेतून विविध वर्षांत बाहेर पडलेले, आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी एकत्र येत शाळेच्या सुवर्ण आठवणींना पुन्हा उजाळा देणार आहेत. जुने सहाध्यायी, शिक्षक आणि शाळेशी असलेले हृदयाचे नाते पुन्हा दृढ करण्यासाठी हा मेळावा विशेष ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत नाश्ता व नोंदणी या सत्राने होईल. यानंतर १०.३० वाजता राष्ट्रीय गीत सादर करण्यात येईल. तत्काळ अजी–माजी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ होणार असून यामध्ये विविध पिढ्यांच्या विद्यार्थ्यांना एकमेकांना भेटण्याची आणि शालेय दिवसांच्या आठवणी जागवण्याची संधी मिळणार आहे.
१०.३५ ते ११.३० या वेळेत स्वागत समारंभात माजी विद्यार्थी तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर ११.३० ते १.३० या वेळेत शिक्षकांचा सत्कार व माजी विद्यार्थ्यांची मनोगते सादर केली जातील. अनेक विद्यार्थी शाळेने जीवनात दिलेली दिशा, शिक्षकांचे योगदान आणि विद्यालयाच्या संस्कारांचा प्रभाव याबाबत मनोगते व्यक्त करणार आहेत.
दुपारी १.३० ते २.३० या वेळेत भोजनाचे आयोजन असून त्यानंतर २.३० ते ४.३० या वेळेत रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. विद्यालयातील विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मिळून विविध कलाप्रकारांची मेजवानी सादर करणार असून नृत्य, गीते, लघुनाटिका आणि काव्यसादरीकरण यातून मेळाव्याची रंगत अधिक वाढणार आहे.
शेवटी ४.३० ते ५.०० या वेळेत समारोप सोहळा व चहा–नाश्ता असेल. पुन्हा भेटण्याच्या आश्वासनासह कार्यक्रमाची सांगता होईल.
या मेळाव्याचे नियोजन पुढील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे —
✔ डॉ. नरेंद्र पुरुषोत्तम इंगोले – अध्यक्ष, नेताजी शिक्षण प्रसारक संस्था, राळेगाव
✔ श्री. विजय गोपाळराव तायडे – सचिव, नेताजी शिक्षण प्रसारक संस्था, राळेगाव
✔ श्री. प्रशांत शामराव वासेकर – मुख्याध्यापक, नेताजी विद्यालय, राळेगाव
✔ श्री. महेश मुकुंदराव ओंकार – अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना
मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
—
