वडकी येथे खासदार संजय देशमुख यांची धावती भेट, कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान तालुक्यातील वडकी गावाला धावती भेट दिली. लोकसभेचे खासदार झाल्यानंतर संजय देशमुख हे पहिल्यांदाच वडकी येथे आले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले.
नंतर खासदार संजय देशमुख यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल वडकी येथे स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन केले व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वडकीचे माजी सरपंच डॉक्टर नरेंद्र इंगोले व शिवसेनेचे बाबारावजी महाजन यांनी वडकी गावात उद्भभवणाऱ्या विविध समस्येचे निवेदन खासदार संजय देशमुख यांना दिले.यावेळी खासदार महोदयांनी त्वरित समस्या निकाली काढण्याचे आश्वासित केले. व खैरी कडे रवाना झाले.
यावेळी त्यांचेसोबत माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके,सभापती प्रफुल मानकर. शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे,वडकीचे माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,बाबारावजी महाजन शेषराव ताजने,वीरेंद्र मोघे,हेमंत वाभिटकर,शरद सराटे बंटी तेलतुंबडे,दिनेश काळे,इम्रान पठाण,अमित उताणे.राजू कोसरे अमित वैद्य यांचे सह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.