
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्याच्या चोहोबाजुंनी जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध जूगार अड्डे दररोज किंवा दोन तीन दिवसाआड स्थळ बदलवून भरविले जात आहे. या विषयी राळेगांव पोलिस स्टेशन ठाणेदारां नी आपल्या हद्दीत असे काही सुरु नाही असे सांगितले पण या आठवड्यात सोनूर्ली शिवार जंगलात चार चाकी आलीशान वाहने,मोटरसायकल चा वावर वाढलेला निदर्शनास येत आहे हे विशेष. या पुर्वी वरुड जहांगीर परिसरात यवतमाळ गुन्हे शाखा यांनी यशस्वी धाड मारली. या मागील “मास्टर माइंड” पोलिस प्रशासनाला चांगला च सुपरिचित आहे.राळेगांव व कळंब पोलिस स्टेशन च्या बाॅर्डर हा जूगार अड्डा गेल्या दोन्ही कोरोणा लाॅकडाऊन च्या काळात भरभराटीस आला आहे. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
याला समर्थ आर्थिक साथ म्हणा की पोलिस प्रशासनाच्या काही झारीतील शुक्राचार्यां चा आशिर्वाद तर नाही ना?अशी शंका येत आहे….
