

राळेगाव:- शहरात एकमेव सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन करणारे युवा गणेश उत्सव मंडळ आहे व ते दरवर्षी लोक उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करतात यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदान केले आमदार डॉ अशोक उईके यांनी मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची आरती सुध्दा केली. दुसऱ्या दिवशी शहरांतील सर्व प्रशसिक अधिकारी उपविभागीय सुधीर पाटील तहसीलदार अमीत भाईटे, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी केशव पवार, मुख्याधिकारी, युवा उद्योजक मेंडोले उपनगरध्यक्ष जानराव गिरी सोबतच सर्व बाँकेचे व्यवस्थापक व्यापारी यांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनसाठी मंडळाचे रुपेश बोरकुटे अध्यक्ष वैभव देशमुख सचिव शशिकांत धुमाळ दर्शन मुनोत शुभम दुधपोळे साहिल नगराळे भूषण बोथरा हेमंत धोटे महेश डंभारे विनय मुनोत विरेंद्र वाऱ्हेकर गजानन काळे सुयश कारिया प्रतीक राऊत हर्षल नेहारे यश गुंदेचा शुभम ब्राह्मणवाडे शुभम ठाकरे समीर तेलंगे यश मुथा चेतन वर्मा
चेतन हिंदुजा राहुल बोरा शुभम मुके
गजानन बांलाद्रे प्रवीण झोटिंग व सर्व मंडळाचे सदस्य यानी सहकार्य केले.
