
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील लोणी येथे चोर बीटी बियाण्याची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या पथकला मिळाली या माहितीच्या आधारे दिं ९ जून २०२५ रोज सोमवारला स्थानिक गुन्हे शाखाy यवतमाळ द्ववारे मौजा. लोणी येथे प्रशांत विठ्ठल भोकटे वय ४४ वर्ष यांच्या जाऊन धाड टाकली असता काहीही आढळून आले नाही मात्र त्यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यामध्ये प्रशांत भोकटे यांनी बैलाच्या चाऱ्याच्या कुटारात अनधिकृत व शासन मान्यता नसलेले बोगस कपाशी बियाण्याचे पाकीट लपवून ठेवल्याचे आढळून आल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी ठेवलेल्या या कुटारामध्ये एकूण बोगस बियाण्याच्या ५० पॉकिट जप्त केली आहे.या जप्त केलेल्या कपाशी बियाण्याची एकूण किंमत ४०००० एवढी असून प्रशांत भोकटे यांच्यावर पोलीस स्टेशन राळेगाव येथे एफ आय आर दाखल करण्यात आला आहे .
ही सदर कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ, व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ व मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली असून सदर कार्यवाही धीरज मोहेकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण अधिकारी यवतमाळ निलेश भोयर कृषी अधिकारी पंचायत समिती कळंब, मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव राहुल वंजारी, विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती, राळेगाव यांचे चमुने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
कपाशी बियाणे शासनमान्य दुकानातूनच खरेदी करा
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी व इतर बियाणे परवानाधारक अधिकृत दुकानदारांकडूनच खरेदी करुन बियाण्या संदर्भात होणाऱ्या फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन पंचायत समिती राळेगावच्या कृषी अधिकारी मनिषा पाटील यांनी केले आहे
