
भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य व्यक्तीला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समाज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्ताने वरोरा तालुका वकील संघामध्ये अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले.
आधीवक्ता परिषद, चंद्रपूर व तालुका बार असोसिएशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमंदिर वरोरा येथे दि. 20. 9. 2024 रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ अधिवक्ता श्री जयंत अलोणी साहेब यांनी या अभ्यास वर्गात नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले आहे. सदर अभ्यास वर्गात अध्यक्ष म्हणून वरोरा तालुका बारा असोसिएशनचे अध्यक्ष एड.जी.के. बोढाले, प्रमुख पाहुणे अधिवक्ता परिषद विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष श्री अभय कुल्लरवार व अधिवक्ता परिषदेची वरोरा संयोजिका ऍड. सौ. भावना लोया तसेच सर्व अधिवक्तागण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका बार असोसिएशन वरोराचे सचिव एड.आदेश अलोने यांनी केले
