यवतमाळ जिल्ह्यातील कळंब १२६ यवतमाळ १२२ तर राळेगाव ४४ नागरी प्रकल्प यवतमाळ १२४ अंगणवाडी कर्मचाऱ्यानी केले मोबाईल परत



शासनाने योग्य निर्णय घेतले नाहीतर २४ सप्टेबर रोजी देशव्यापी संप
शासनाने दिलेले मोबाईल ठरले कुचकामी

राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर(9529256225)

शासनाने आँनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत ,या मोबाईची वाँरटी संपलेली असून हँग होणे ,बंद पडणे,डिसप्ले जाणे, आयसे प्रकार घडत आहेत .मोबाईल दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे .या प्रकाराला ञासलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १७ आँगस्ट पासून शासनाला मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला .याची सुचना शासनाला आयटकने फरवरीत दिली होती . १६ आँगस्ट पर्यत निर्णय शासनाने घेतले नाहीतर १७ आँगस्ट पासून मोबाईल परत करण्याला सुरुवात केली असून आज २४ आँगस्ट सोमवार रोजी बालविकास प्रकल्प कार्यालय कळंब यवतमाळ( ग्रामीण ) राळेगाव नागरी प्रकल्प यवतमाळ येथील ४१६ अंगणवाडी सेविकांनी आयटकच्या नेतृत्वाखाली मोबाईल कार्यालयात जमा केले काही मोबाईल दुरुस्ती साठी कार्यालयात दिले होते.कळंब राळेगाव यवतमाळ ग्रामीण व शहरी यवतमाळ आयटक अःगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे पियंकाताई पारधी निर्मलाताई फाळके ज्योतीताई चिवाने ललीताताई बोळके रत्नमालाताई पाटील लताताई रेवडे चंद्रकलाताई बरडे , यवतमाळ सवीताताई कट्यारमल , गयाताई सावळकर पल्लवीताई रामटेके ,शोभाताई बोरकर , कोमलताई रींगणे , मंगलाताई तोंडरे नंदाताई सुतरकर पुनमताई कोहरे , प्रनालीताई लाकडे राळेगाव छायाताई दांडेकर सुनंदाताई परोते शांताताई कन्नाके विद्याताई झोटींग नागरी प्रकल्प यवतमाळ ज्योतीताई खडतकर अल्काताई तोडसाम ज्योतीताई खोबरागडे मनिषाताई बलखंडे छायाताई मंडावी मिनाताई नेवसे प्रणिताताई राजूरकर ललीताताई भोयर शोभनाताई कोंटबे कौशल्याताई मस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन मोबाईल परत कण्यात आले.
शासनाने योग्य निर्णय घेतले नाही तर २४ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय आयटकने घेतला. आहे असे मत कॉ.दिवाकरभाऊ नागपुरे , आयटक जिल्हा कार्याध्यक्ष यांनी व्यक्त केले..
शासनाने दिलेले सर्व जूने मोबाईल परत घेवून नविन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे मोबाईल मध्ये बाघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.
केंद्र शासनाने जूना काँमन एप्लीकेशन एप्स (कँश) बंद करुन नविन पोषण टँकर एँप्स दिलेला असून तो सदोष आहे .सर्व माहीती इंग्रजी बरावी लागत आहे महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टँकर एँप्स मराठीत करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी होत्या.