
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तालुक्यातील मौजे श्रीरामपूर येथे उप विभागीय कृषी अधिकारी जगण राठोड , तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी पांडुरंग देशमुख यांच्या शेतात पिकाची पाहणी केली व कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी, यांच्या नियंत्रणाकरिता प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत.
डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.
नियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हेक्टरी) कपाशी पिकात लावावेत.
आर्थिक नुकसानाची पातळी : एक जिवंत अळी प्रति १० हिरवी बोंडे किंवा ८ ते १० पतंग प्रतिसापळा सलग तीन रात्री.
कीटकनाशकांची फवारणी : (प्रतिलिटर पाणी) अझाडिरॅक्टीन (०.१५ टक्के) – ५ मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (०.३० टक्के) – ४ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) – २ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) – २ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) – १ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (५० टक्के) + सायपरमेथ्रीन (५ टक्के ई सी) – २ मि.लि.
तसेच सोयाबीन वरील पिवळा मोझाक रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त पाने वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
प्रतिलिटर पाणी- नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण
थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि किंवा
बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के डब्ल्यू ओडी) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिलि किंवा
ॲसिटामिप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ इत्यादी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक तुषार मेश्राम व कृषी पर्यवेक्षक राजू ताकसांडे व शेतकरी उपस्थित होते
