
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढानकी
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर किंवा चारचाकी वाहन असावे व उच्च शिक्षणासाठी बहुसंख्य व्यक्ती कर्ज घेतात त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखे किंवा नवल नाही. सद्य परिस्थितीत आता शाळेची फी भरना करावयाचा असल्यास पालकावर कर्ज काढून व थोड्या थोड्या प्रमाणात अर्थातच हप्त्याच्या स्वरूपात ते कर्ज भरण्याची वेळ आली आहे. खाजगी शाळेची फी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पालकांना फी स्वरूपात आर्थिक वजाबाकी साठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात इंग्रजी व सीबीएससी पॅटर्न राबविणाऱ्या शाळेने मात्र मोटारगाड्या भाड्याने देऊन आनंद लुटला. उलट यासंदर्भामध्ये एखाद्या शाळेला विचारणा केली असता आम्ही खूप स्वस्तामध्ये मोटर गाड्या भाड्याने देतो आम्ही करत असलेलं काम म्हणजे समाजसेवाच म्हणा असं सुद्धा सांगतात ही समाजसेवा करत असताना इतरांच्या पाल्यांच्या जीवांशी खेळ करून खरंच ही सेवा ठरते?? सर्वसामान्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की या मोटर गाड्या भाड्याने लावणे चुकीचे असून अपघात झाल्यास उद्या प्रशासन गाड्या भाड्याने लावणाऱ्यालाच दोषी ठरवू शकते. कोणत्याही स्वरूपात नुकसान भरपाईचा लाभ या ठिकाणी मिळू शकत नाही. “भाईजी” व “साहेबांनी” मिळून “चल उडवून देऊ बार लगीन सराईचा” म्हणत शाळेच्या गाडीवर आपल्या शाळेसाठी मनमुराद पणाने मोटारगाड्या भाड्याने देऊन हम किसी से कम नही म्हणत कमाई केली. यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी बेसरम मधून कधी गुळ निघालेला बघितला नाही आणि ऐकिवात सुद्धा नाही. ज्या व्यक्तीचे नाव अख्ख्या जगात आदराने घेतले जाते अशाचे नाव शाळेला दिले खरे पण नीतिमत्ता मात्र निव्वळ कमाईची ठरलेली राहिलेली दिसते. महापुरुष असलेल्या व्यक्तीच्या विचारांची “साहेबांनी” व “भाईजींनी” तिलांजली वाहिली यामुळे पालक वर्गात “असंतोष” पसरला आहे.पालकांनी याबाबत संबंधितांना जाब विचारायला पाहिजे. स्वयम अर्थसाहित असले तरी संविधानाला अनुसरून त्यांनी परवानग्या घेतल्या म्हणजे त्यांना सर्वसामान्यांना ग्राह्य न धरता सर्वांची अनुमती घेणे गरजेचे असते पण असे होते??की साहेबांचा आणि भाईजी यांचा मनमानी कारभार झाला??काही जण बाजूला राहून सोंग बघतात पण ते सुद्धा त्याच्यातील एक असून आतून त्यांचेच तुणतुणे वाजविणारा आहे.
जून पासून शाळेचे शैक्षणिक सत्र सुरू होते यासाठी नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया बहुधा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू होते शिवाय मार्च व एप्रिल हा प्रवेश घेण्याचा पहिला व शेवटचा टप्पा राहिलेला आहे .त्यामुळे शाळेच्या प्रथम टप्प्यातील फी भरण्यासाठी पालकांची धावपळ आणि जमवाजमव सध्या चालू असल्याची माहिती पडते. सीबीएससी शाळेमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यामागे पाच पुस्तके आणि विषयाला अनुसरून प्रयोगशाळेची गरज असते. आयबी शाळांमध्ये प्रत्येकी दोन डझन विद्यार्थ्यांमागे शिक्षकांनी नवनवीन उपक्रमशील योजना राबविणे आवश्यक असते. इंग्रजी शाळेकडे मुलांचा व त्यांच्या पाल्यांचा कल वाढला असून त्याच बाबीचा अभ्यास करून दोन वर्षातून एक वेळा सर्व फी मध्ये वाढ केली जात आहे. मागील काही वर्षात स्वयं अर्थसहाईत शाळेचे शैक्षणिक शुल्क दहा पटीने वाढले असून सध्या ढाणकी शहराच्या आजूबाजूला वसलेल्या शाळांमध्ये पाल्यास प्रवेश प्राप्त करण्यासाठी पंचवीस हजार ते सव्वा लाख रुपये द्यावे लागत आहे पालकांची मुलांसाठी गरज ओळखून इंग्रजी शाळा आता असलेल्या सुविधेत सुधारणा करण्यासाठी व त्यात आधुनिकता अणु अशी थाप मारून शुल्क दर दोन वर्षाला वाढवत असताना पालकांनी या बाबीला अनुसरून प्रवेश घेताना सर्व सोयी सुविधा, मागील वर्षाचे एकूण फी किती व कशाची आणि यावर्षी त्यात आर्थिक किती वाढ झाली हे सगळे चोखंदळपणे बघायला पाहिजे.
