आगपिडीतांना आर्थिक मदतीसह परिवारातील सदस्याला शासकीय नोकरी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्य सचिवांना निवेदन


शासकीय, खाजगी व स्वयंसेवी संस्थांच्या दवाखान्यातील सुविधांचे अंकेक्षण करा

वाशिम – शासकीय, खाजगी व स्वयंसेवी संस्थांच्या दवाखान्यातील सुविधांचे अंकेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० एप्रिल रोजी प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, भंडारा, नाशिक, विरार आदी शहरामध्ये स्थित काही दवाखान्यामध्ये व मान्यताप्राप्त खाजगी दवाखान्यामध्ये आग लागल्यामुळे जवळपास ५० चे वर रुग्ण मृत्यमुुखी पडले असल्याचे आपणा सर्वाना विदीत आहे. ढोबळमानाने दवाखाना प्रशासनाने संपुर्ण दुर्लक्ष केले असल्याचे वेळीच देखभाल दुरुस्ती केलेली नसल्याने याकरीता जबाबदार प्रशासकीय यंत्रणा दोषी असावेत असे दिसून येते. या सर्व घटनांची चौकशी होईल, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे कुटुंबियांना अर्थसहाय्य देखील दिले जाईल. यामुळे त्या कुटुंबियांचे जे कायम नुकसान झाले आहे त्याकरीता कायमस्वरुपी मदत होणे आवश्यक आहे. त्याकरीता सर्व आपत्तीग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे. विषयामध्ये नमूद इमारतीचे अग्नीशमन यंत्रणा, गॅस सिलेंडस, इमारतीची स्टॅनिलिटी गुणवत्ता व दर्जा तसेच बांधकामाविषयक देखभाल दुरुस्ती करणे. या इमारतीमधील विद्युत पुरवठा वाहिन्याचे, यंत्राची लिकेजेसची, तुटफुटीची दुरुस्ती वेळीच करण्याकरीता या सर्व बाबीचे अंकेक्षण होणे नियमाने बंधनकारक असून काळाची गरज देखील आहे. तसेच भविष्यात ह्दयद्रावक दुर्घटना घडणार नाहीत व त्याला काहीसा आळा बसविता येईल. याकडे वैयक्तीक लक्ष घालून आवश्यक सुचना वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग व अन्य संंबंधीत विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.