राळेगाव तालुक्यासाठी “नशामुक्त पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ श्री पवन बनसोड सर,अपर पोलीस अधीक्षक श्री पियूष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा पोलीस दल तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी राळेगाव तालुक्यासाठी “नशामुक्त पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा हरे कृष्ण मंगलंम राळेगाव येथे दोन सत्रात आयोजीत करण्यात आला होता. प्रथम सत्रात राळेगाव तालुक्यातील 8 शाळा तसेच महाविद्यालयातील एकूण 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच दुसऱ्या सत्रात राळेगाव तालुक्यातील पोलिस पाटील,शिक्षक व नागरिक असे मिळून अंदाजे 250 नागरिकांनी सहभाग नोंदविला. व्यसनमुक्ती शिबिरात मुक्तांगण येथील श्री निहार हसबनीस सर यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम हा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ श्री पवन बनसोड सर, अपर पोलिस अधीक्षक श्री पियूष जगताप सर, उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा श्री रामेश्वर वेंजने सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्ण जाधव ,ठाणेदार,पोलिस स्टेशन राळेगाव, श्री विजय महाले, ठाणेदार पोलिस स्टेशन,वडकी यांनी तसेच दोन्ही पोलिस स्टेशन चे संपूर्ण अधिकारी,अंमलदार व होमगार्ड्स यांच्या सहकार्याने पार पडला. सदर कार्यक्रमात “व्यसनमुक्ती शपथ” देखील घेण्यात आली.तसेच सदर शिबिराच्या अनुषंगाने क्रांती चौक येथे जनजागृती पर “पथनाट्य” देखील सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेश काळे तसेच प्रास्ताविक प्रा. अशोक पिंपरे सर यांनी केले.आभार प्रदर्शन ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी केले.