अळ्या पडलेल्या गाईला जीवनदान ,प्यार फौंडेशन व बजरंग दल ची संयुक्त सेवा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगांव येथे एक गो मातेचा शिंग फुटून जखमे मधी अळ्या पडेल्या आहे हि माहिती माहिती मिळताच तातडीने चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन चे संस्थापक देवेंद्र जी रापेल्ली व मंगल जी खडे यांना संपर्क साधून गो मातेच्या उपचारा करीता विनंती करताच त्यांनी ३ सहकाऱ्यांसह बोलेरो गाडी घेऊन राळेगाव कडे रवाना केले . 6 तासाच्या अथक प्रयत्ननंतर गाईला पकडण्या मध्ये गेले.
गाईचा बचाव कार्य संपन्न करून तिला चंद्रपूर येथे उपचारा करीता रवाना केले. या वेळी चंद्रपूर येथील शंकरजी उईके, रोमिओ दादा, पवन वर्मा, (बजरंग दल सह-संयोजक) जगदीश निकोडे, दिनेश शेंडे, अक्षय भोंगे, सूरज कार्लेकर, व रामतीर्थ येथिल गोरक्षक बंधू उपस्थित होते.x